एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिक हादरलं! घरात घुसून आधी आईला बेशुद्ध केलं अन् तीन महिन्याच्या मुलीला संपवलं

Nashik Crime : नाशिक (Nashik)  शहरात रोजच नवनव्या घटनांनी शहर हादरत असून रस्त्याने चालणं देखील अवघड झालं आहे.

Nashik Crime : नाशिक शहरात (Nashik City) सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. आज शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने घरात घुसून आधी आईला बेशुद्ध केलं, त्यानंतर एका लहानग्या मुलीला गळा चिरून संपवल्याची संतापजनक घटना घडली आहे. गंगापूर-सातपूर लिंक रोडवर ही घटना घडली आहे. घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.  

नाशिक (Nashik)  शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आता कळस गाठत आहे. रोजच नवनव्या घटनांनी शहर हादरत असून रस्त्याने चालणं देखील मुश्किल झालं आहे. अशातच गंगापूर पोलीस स्टेशन (Gangapur Police Station) हद्दीतील धृवनगर परिसरात आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. धृवांशी भूषण रोकडे असं या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-सातपूर लिंक रोड येथील धृवनगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि 3 महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली.

आजीच्या पायाखालची जमीनच सरकली... 

दरम्यान, या महिलेने धृवांशी हिच्या आईच्या नाकाला रूमाल लावल्याने ती बेशुद्ध झाली. यानंतर या निर्दयी महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या निरागस धृवांशीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले. दुसरीकडे चिमुकली नात धृवांशी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्यांनी आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल.... 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीची आई शुद्धवीर आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र तीन महिन्यांचा लहान चिमुकलीची हत्या का केली याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget