एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकमधील 95 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, इन्स्टा पोस्टमध्ये म्हणाला, तीन वर्षांपूर्वीच मरणार होतो, पण गर्लफ्रेण्डमुळे...

Nashik Crime News : दहावीमध्ये विद्यार्थ्याने 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही काळाने त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती.

Nashik Crime News: “मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे... माझ्या आयुष्यात आता कोणतेही ध्येय किंवा स्वप्न उरलेले नाही... माझं अस्तित्व अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे... साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ...” अशी हृदयद्रावक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गंगापूर रोडवरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट तपासासाठी महत्त्वाची ठरत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Nashik Crime News: दहावीमध्ये 95 टक्क्यांहून अधिक गुण

मृत विद्यार्थी पाथर्डी फाटा परिसरात पालकांसोबत राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून तो त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याने गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळवत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दहावीमध्ये त्याने 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही काळाने त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Nashik Crime News: काय होती शेवटची पोस्ट?

"हाय गाइज... तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात आता कोणतंही ध्येय किंवा स्वप्न शिल्लक नाही. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगलो. शाळेपासूनच मी नैराश्य आणि मानसिक त्रासात होतो. आता मात्र तो टोकाला पोहोचला आहे.

माझ्या कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही, मीच पात्र नव्हतो. तुमचे सर्व प्रयत्न मी वाया घातल्याबद्दल क्षमस्व. सॉरी… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ. गुड बाय...” असे विद्यार्थ्याने शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Nashik Crime News: सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या पोस्टनंतर काही मित्रांनी त्याला समजावत, “अरे, अभ्यास कर. वेडेपणा करू नको” अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्याचंही उघड झालं आहे. मात्र तोवर वेळ निघून गेली होती.

Nashik Crime News: पोलिसांकडून तपास सुरू

पोस्टमध्ये व्यक्त केलेली भावना आणि उल्लेखांमधून त्याच्या मानसिक अवस्थेचा अंदाज घेत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाविद्यालय, परिसर आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime Bhushan Londhe: नाशिक हादरलं! खंडणीच्या वादातून बारमध्ये गोळीबार, भूषण लोंढेसह 12 जणांवर गुन्हा, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget