एक्स्प्लोर

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: दोन महिने फरार, 34 फुटांवरून मारली उडी, दोन्ही पाय झाले फ्रॅक्चर; कुख्यात गुंड भूषण लोंढे नाशिक पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: सातपूर गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: सातपूर आयटीआय सिग्नल येथील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर (Satpur Firing Case) फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे (Bhusan Londhe) अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंग (Prince Singh) याला देखील उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नेपाळ सीमेवरून (Nepal Border) ताब्यात घेण्यात आले.

गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सातपूरच्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी माहिती मिळताच उत्तर प्रदेशातील बडौत आणि कोटपुतली (राजस्थान) याठिकाणी शोध कार्य सुरु केले. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भूषण लोंढेने 34 फुटांवरून उडी मारली. यात त्याच्या दोन्ही पायांना फॅक्चर झाले आहे.  

Bhushan Londhe Arrested: गुन्हे शाखेच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाची मदत

गुन्हे शाखेच्या तपासात, सुपोनि हेमंत तोडकर, पो.नि. डॉ. समाधान हिरे आणि पोहवा प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याचा मागोवा घेतला. त्यानंतर पथकाला राजस्थानातून उत्तर प्रदेशातील महाराजगंजकडे पाठवण्यात आले. अखेर 35 वर्षीय भूषण प्रकाश लोंढे (रा. स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक) आणि 36 वर्षीय प्रिन्स चित्रसेन सिंग (रा. जगताप मळा, सिडको, नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात यश आले. दोघांना महाराजगंज न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्यात आले आहे.

Bhushan Londhe Arrested: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले

भूषण लोंढेवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर भारतीय दंड संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मकोका आणि मोका यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याचे वडील व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे यांच्याकडूनही पोलिसांनी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ वदवून घेतला होता.

Bhushan Londhe Arrested: बुलडोझरने तोडले होते लोंढेचे कार्यालय

भूषण लोंढेचे वडील प्रकाश लोंढेचे आयटीआय पुलाजवळील पूररेषेतले कार्यालय महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले होते. या कार्यालयात पोलिसांना एक भुयार देखील आढळले होते. तर पोलिसांनी या कार्यालयातून विदेशी मद्यासह हत्यारे जप्त केली होती.  

Bhushan Londhe Arrested: लोंढे टोळीवर मकोका कारवाई

सातपूरचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढेला आधीच या प्रकरणात सहआरोपी केले गेले आहे. दोघेही सध्या नाशिकरोड कारागृहात आहेत. शहर पोलिसांनी लोंढे टोळीवर मकोका अन्वये कारवाई करत, पीएल ग्रुपशी संबंधित अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भूषण लोंढे आणि त्याचा टोळीवर कारवाई ही नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधात पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime Prakash Londhe: विदेशी दारूच्या बाटल्या, कुऱ्हाड, चाकू....; लोंढेच्या 'गुप्त भुयारा'तून नाशिक पोलिसांना काय-काय सापडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Embed widget