एक्स्प्लोर

Nanded Crime : महिपाल पिंपरी इथल्या खून प्रकरणात शुभांगीचे आणखी हाडे सापडली, दिशाभूल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बोलते केले

Nanded Crime : राज्यभरात गाजलेल्या नांदेड महिपाल पिंपरी येथील ऑनर किलिंग प्रकरणात दररोज अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस येत आहेत. तळणीजवळ कॅनॉलच्या बाजूला शुभांगीची आणखी काही हाडे सापडली आहेत.

Nanded Crime : राज्यभरात गाजलेल्या नांदेड (Nanded) महिपाल पिंपरी येथील ऑनर किलिंग प्रकरणात (Honour Killing) दररोज अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस येत आहेत. यात काल (29 जानेवारी) रविवारी नांदेड पोलीस (Nanded Police) पुन्हा आरोपींना घेऊन परिसरात गेले होते. यावेळी तळणीजवळ कॅनॉलच्या बाजूला शुभांगीची आणखी काही हाडे सापडली आहेत. यापूर्वी जोगदंड यांच्या शेतातून आणि हिवरा परिसरातून काही हाडे गोळा करण्यात आली होती. ही हाडे आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. महिपाल पिंपरी येथील शुभांगी जोगदंड या भावी डॉक्टरची वडिलांसह कुटुंबातील लोकांनीच गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर प्रेत शेतात जाळून त्याची राख आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली होती. लिंबगाव पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी ऑनर किलिंगचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला

दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला शुभांगीचा शॉक लागून मृत्यू झाला असून, तिचे अंत्यसंस्कार केल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला होता. तसेच तपासही भरकटवण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत होता. परंतु पोलिसांनी मोबाईल फोनच्या लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु ठेवला आहे. मयत शुभांगीची काही हाडे मिळाली होती. तसेच जोगदंड आणि इतर चार हिवरा भागातही कवटीचा भाग आढळून आला होता. काल रविवारी अनेक खुलासे समोर आले आहेत, ज्यात पुन्हा या आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावर नेण्यात आले होते.

गावात दहशतीचे वातावरण

या प्रकरणी गावातील अनेक नागरिकांची चौकशी करण्यात आली आहे. ज्यात महिपाल पिंपरी गावात दोन गट आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाची माहिती असल्याचे सांगून आरोपींनी गावातील काही जणांची नावे पोलिसांसमोर घेतली होती. पोलिसांनी त्या सर्वांची चौकशी केली आहे. या घटनेमुळे गेल्या चार दिवसांपासून गावात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान महिपाल पिंपरी परिसरातील कॅनॉलमध्ये शुभंगीचे हाडे फेकल्याची माहिती पोलिसांना आरोपींकडून मिळाली, त्या ठिकाणाहून काही हाडे गोळ केली असून आता ही सर्व हाडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

काय आहे प्रकरण?

महिपाल पिंपरी गावातील शुभांगी जोगदंड या तरुणीची 22 जानेवारी रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ती नांदेड इथे BAMS तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने वडिलांसह भावांनी मिळून मुलीला क्रूरपणे मारहाण करुन हत्या केली. तसेच तिला जाळून तिची राख उधळून लावल्याची माहिती होती. या प्रकरणी हत्येनंतर चार दिवसांनी पाच जणांवर 302 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात मुलीचे वडील भाऊ, मामा, दोन चुलतभाऊ अशा पाच जणांचा समावेश आहे.  प्रतिष्ठेपोटी वडील आणि भावांनी तरुणीला जीवे मारल्याचे कळते. मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे  तक्रार केल्याने ही हत्येची घटना उघडकीस आली होती.

संबंधित बातमी

डॉक्टर लेकीला कुटुंबियांनी क्रूरपणे संपवलं; शेतात जाळलं, नांगरणी केली अन् कांदाही लावला, हत्येचा उलगडा झाला कसा?

महत्त्वाच्या बातम्या

कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget