एक्स्प्लोर

Crime News : चोर समजून चालत्या ट्रेनमध्ये एकास लाथाबुक्यांनी मारहाण, तरुणाचा मृत्यू, दक्षिण एक्स्प्रेसमधील घटना

Crime News : चोर समजून चालत्या ट्रेनमध्ये चार प्रवाशांनी तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय.

नागपूर : चोर समजून चालत्या ट्रेनमध्ये चार प्रवाशांनी तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.  शशांक रामसिंग राज असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते दिल्ली येथे जाणाऱ्या दक्षिण एक्स्प्रेसमध्ये (Dakshin Express) चोर समजून चार प्रवाशांनी शशांक रामसिंग राज या तरुणाला चालत्या ट्रेनमध्ये लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दक्षिण एक्स्प्रेस ही सेवाग्रामजवळ असताना जनरल बोगीत आरोपींनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

चार जण ताब्यात 

या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. दक्षिण एक्स्प्रेस ट्रेन नागपूर स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर जखमीची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले

दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली. यात पोटच्या मुलाने आई -वडिलांची हत्या केली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यातर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला. आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: आपल्या मुलीची एका मुलासोबत मैत्री, फोनवरती बोलते, संतापलेल्या वडील अन् भावाने तरुणाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bank Strike | 24 आणि 25 मार्चला बँकांचा संपाचा इशारा, सलग ४ दिवस बँका बंद राहिल्यास नागरिकांना अडचणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 19 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNagpur Crime Update | त्या रात्री जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग, वर्दी खेचण्याचा केला प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Embed widget