Nagpur Accident : जेवणाचा डबा घेऊन जात असताना दुचाकी अन् ट्रकचा अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी
Nagpur Accident : नागपूरमध्ये जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या तिघांचा मृत्यू झालाय.
Nagpur Accident : तीन मित्र जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलने हिंगण्याकडे येत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकने (Nagpur Accident) त्यांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल चालकासह त्याचा एक मित्र जागीच ठार झाले. तर मागे बसलेला युवक सुद्धा गंभीर जखमी झालाय. हा अपघात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास गुंमगाव मार्गावर घडला. आर्यन हुकूमचंद पालिवाल( वय 23),सुमेध उर्फ सुमित राहुल सिरसाट (वय 17) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे असून अरमान रवींद्र मडामे (वय १७) हा गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही मोटरसायकल स्वार महाजनवाडी ,वानाडोंगरी हिंगणा रोड नागपूर (Nagpur Accident) येथील रहिवासी असून मित्र आहेत.
चंद्रपुरात भीषण अपघात, आजी-आजोबासह नातीचा मृत्यू
दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला चंद्रपुरात ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा सह नातीचा मृत्यू झालाय. भद्रावती शहराजवळील डाली पेट्रोल पंप येथील यु-टर्न जवळ ही घटना घडलीये. मंजुषा नागपुरे (वय 47 वर्षे), सतीश नागपुरे (51) आणि माहिरा नागपुरे (2) अशी या अपघातत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या रासाघोणसा येथील हे सर्वजण भद्रावती येथे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात मंजुषा नागपुरे यांचा जागीच तर सतीश नागपुरे आणि माहिरा नागपुरे यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 4 जण जागीच ठार
नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. अक्कलकोट तालुक्यात 4 भाविक जागीच ठार तर 7 जण जखमी झालेत. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे अपघात झालाय. स्कोर्पिओ आणि आयशचर ट्रकच्या भीषण अपघातात भाविकांनी जीव गमावलाय. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या