घोषणाबाजीवरुन वातावरण तापलं, भिवंडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले, जोरदार हाणामारी
भिवंडीत महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
Bhiwandi : भिवंडीत महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये भाजप उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची कार्यालये रस्त्यात समोर समोर आहेत. सायंकाळी काँग्रेस उमेदवार रॅली घेऊन भाजपा कार्यालय समोर घेऊन येत घोषणाबाजी करु लागल्याने वादंग निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक व काठ्यांचा हाणामारी केली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
भाजप कार्यालयाजवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानं वाद
काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय मनोज म्हात्रे यांच्या पत्नी वैशाली म्हात्रे , जितेंद्र पाल हे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गल्लीतून जात होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यातच कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. यातून भाजप आणि काँग्रेस आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या उमेदवाराने आरोप लावला आहे की भाजप कार्यालयामध्ये येऊन घोषणाबाजी करण्याची काहीच गरज नव्हती. याबाबत जाब विचारला असता समोरून दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप लावताना सांगितला आहे की प्रचार करण्यासाठी गेलो असताना भाजपच्या लोकांनी दादागिरी केली. त्यांच्यामुळे धक्काबुक्की करून तोडफोड आणि दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सध्या पोलीस करत असून परस्पर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
पाठिंबा देण्याच्या मुद्यावरुन परभणीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
पाठिंबा देण्याच्या मुद्यावरुन परभणीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय देशमुख यांनी मारल्याचा आरोप भाजपला समर्थन देणाऱ्या वामन मोरे यांनी केला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी मला त्यांनी अनेक वेळा फ़ोन केला पण त्यांना भाव दिला नाही. त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी उमेदवार अक्षय देशमुख यांनी व्यक्त केले. मी कशाला मारहाण करु तो आरोप चुकीचा असल्याचे मत अक्षय देशमुख यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीत परभणी जिल्ह्यात राजकीय वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:























