एक्स्प्लोर

Mumbra Murder Case : नशा करू नको असे सांगणाऱ्या मित्राची केली हत्या, 'शहाणपणा' बेतला जीवावर 

Mumbra Murder Case : नशा करू नको असं सांगणाऱ्या अल्पवयीन मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची घटना मुंब्य्रामध्ये घडली. 

ठाणे : नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचाच राग आल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघड झाला आहे. त्यामुळे नशेच्या मोहापायी तरुण मुले खून करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे.  हत्या करण्यात आलेल्या मेहताब याचा मृतदेह 9 जून रोजी मुंब्रा आंबेडकर डोंगरावर सापडला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

रेहान बाग येथे राहणाऱ्या मेहताब मंसुरी (वय 15 वर्ष)  हा 6 जूनपासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 9 जून रोजी मुंब्रा बायपास रोडवर असणाऱ्या आंबेडकर डोंगरावर मेहताब याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. 

पोलिसांनी यासंदर्भात तपास केला असता मेहता मन्सुरी याची मुंब्रा देवी पद येथे राहणाऱ्या 23 वर्षांच्या फैज सुलतान मलिक याच्याशी ओळख असल्याचे समोर आले. त्या दिशेने तपास करत असताना मेहताब हा खेळायला जात असताना बाजारपेठेत फैज याला भेटल्याचे समोर आलं होतं. 

त्या दिवशी फैज सुलतान हा आंबेडकर डोंगरावर नशा करण्यासाठी जात होता. याचवेळी मेहताब मंसूरी त्याला भेटला यावेळी मेहताबने देखील आपल्याबरोबर नशा करण्यासाठी यावे अशी फैजची इच्छा होती. यासाठी त्याने मेहताबच्या मागे तगादा लावला. त्यानंतर मेहताब याला इच्छा नसतानाही तो फैज बरोबर जबरदस्तीने जावं लागलं. 

यावेळी फैजने त्या ठिकाणी नशा करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी मेहताब याने नशा करू नको असे फैज याला वारंवार सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याच रागात मेहताब याने फैजला नशा करत असल्याचे घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. यावेळी मात्र फैजला राग आला आणि याच रागामध्ये फैजने मेहताब याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याचा खून केला. 

यासंदर्भात पोलिसांच्या हाती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार फैज सुलतान याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास मुंब्रा पोलिस करत आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget