एक्स्प्लोर

मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल ऑऊट, निवडणूक आचारसंहिता काळात मोठ्या कारवाया, गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा (NDPS ACT) अन्वये एकुण 5 कारवाया करण्यात आल्या आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राखण्याकरिता मुंबई पोलिसांकडून 3 व 4 मे रोजी All Out  Oprection अंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत पोलिसांनी मुंबई शहर (Mumbai) व परिसरातील गुन्हेगारीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील 8 पाहिजे /फरारी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एकूण 53 अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) ची बजावणी करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. देशात आचारसंहिता असल्याने सर्वत्र पोलिसांचा (Police) अलर्ट मोड असून महाराष्ट्रातही निवडणुका सुरू असल्याने पोलीस कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणूक काळात होत असलेल्या चुकीच्या कृत्यांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.  

पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा (NDPS ACT) अन्वये एकुण 5 कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच, अवैध शस्त्र (Illegal weapons) बाळगणाऱ्या एकुण 49 कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध अग्निशस्त्र हत्यारे, बंदूक जप्तीच्या एकुण 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या विशेष मोहित कारवाईंतर्गत 2 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली असून 2 आरोपींस अटक करण्यात आली आहे.

अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर 24 ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान 30 आरोपींस अटक करण्यात आली. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने एकुण 62 कारवाया करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120,122,135,142अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 175 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर (Hawkars) एकुण 154 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर, बृहन्मुंबई शहरात एकुण 206 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील 964 आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये 230 आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. येथील सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण 111 ठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) लावण्यात आली होती.

पोलीस नाकाबंदीतील कारवाई

1) त्यामध्ये एकुण 7233 दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.

2) मोटार वाहन कायद्यान्वये 2440 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

3) कलम 185 मोवाका अन्वये 77 वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली.


दरम्यान, बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 800 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणीही करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकांची आचारसंहिता अद्यापही सुरू असल्याने पोलिसांकडून कारवाई सुरुच आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Pune Crime News: पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
Embed widget