एक्स्प्लोर

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!  OLX वरून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी कारवाई करून  OLX वरून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai Crime News : OLX वर खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबईच्या सायबर सेलने परराज्यातून या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख रोख रक्कम, 9 मोबाईल फोन, 32 डेबिट कार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओएलेक्सवरून फसवणूक झालेल्या काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सायबर सेलने याबाबतचा तपास सुरू केला. त्यासाठी सायबर पोलिसांची काही पथके देखील तयार करण्यात आली. पोलिसांनी मुंबईतील 10 गुन्हे तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. 

 मुंबई पोलिसांनी याबाबत अधिक तपास केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी OLX च्या नावाने फसवणूक तर केलीच आहे. परंतु, सेक्शटोर्शनचीही मोडस ओप्रेडी समोर आली आहे. या टोळीने मुंबईत असे 11 गुन्हे केले आहेत. या सर्व 11 गन्ह्यांचा मुंबई पोलिस कसून तपास करत आहेत. या टोळीसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? फसवणूक सोडून आणखी काही गुन्हे या टोळीने केले आहेत का? याचा देखील पोलिस कसून तपास करत आहेत. 

Mumbai Crime News :  असा झाला भांडाफोड 

मुंबई पोलिसांनी एका तक्रारीवरून या टोळीचा पर्दाफाश केलाय. मुख्य तक्रार देणाऱ्या फिर्यादीची सुरतहून मुंबईला बदली झाली होती. संबंधित व्यक्तीने फर्निचर विक्रीसाठी OLX वर जाहीरात दिली होती. या जाहिरातीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रादाराची फसवणूक केली. त्यानंतर सबंधितांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत कसून तपास केल्यानंतर आरोपींबाबत धागेदोरे हाती लागले. खोलात जाऊन तपास केल्यानंतर फसवणूक करणारे आरोपी हे राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने दोन्ही राज्यांतून चार आरोपींना बेड्या ठोकल्या. 

महत्वाच्या बातम्या

मुंबई आयआयटीतील मुलीचा पोलिसाकडून विनयभंग, नवी मुंबईतील पाम बीचवरील धक्कादायक घटना  

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath crime: अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद
अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद
Mumbai Protest Girl Riya Ahir: एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
Sushma Andahre On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Embed widget