एक्स्प्लोर

खळबळजनक! तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली; दोन कुटुंबीयांचा एकमेकांवर हल्ला, 3 ठार 4 जखमी

हमीद शेख (वय 49 वर्षे), रमणलाल गुप्ता (वय 50 वर्ष) आणि अरविंद गुप्ता (वय 23 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असून हे सर्व गणपत पाटील नगर मधील रहिवाशी आहेत.

मुंबई : मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचं गंभीर गुन्ह्यात रुपांतर झालंय. या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

हमीद शेख (वय 49 वर्षे), रमणलाल गुप्ता (वय 50 वर्ष) आणि अरविंद गुप्ता (वय 23 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असून हे सर्व गणपत पाटील नगर मधील रहिवाशी आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आज दोन्ही बाजूने तुफान राडा झाला होता. याच राड्यामध्ये गणपत पाटील नगर परिसरात असलेला दुकानदारांकडून चाकू आणि कोयता घेऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये, तीन जणांचा जीव गेला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, सध्या एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच बी पोलीस ठाणे गणपत पाटील नगर या झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेख व गुप्ता परिवारांमध्ये 2022 मध्ये क्रॉस गुन्हे दाखल होते. तेव्हापासून त्यांचे वैमनस्य आहे. आज रोजी 4.30 वाजेच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 चे रस्त्यावर राम नवल गुप्ता याचा नारळ विक्री स्टॉल समोर अमित शेख हा दारू पिऊन आलेवर त्यांचेत वाद सुरु झाले. दोघांनी आपले मुलांना बोलावले. त्यानंतर, गुप्ता त्याची मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता व अमित गुप्ता यांची आणि हमीद नसिरुद्दीन शेख, त्याची मुले अरमान हमीद शेख व हसन हमीद शेख यांच्यामध्ये हाताने व धारदार शस्त्राने मारामारी झाली. सदर मारहाणीमध्ये राम नवल गुप्ता (वडील) व अरविंद गुप्ता हे मयत झाले असून अमर गुप्ता व अमित गुप्ता जखमीआहेत.  तसेच हमीद शेख (वडील) हा सुद्धा मयत झाला असून त्याचा मुलगा अरमान शेख व हसन शेख जखमी आहे. शताब्दी हॉस्पिटल येथून मृतदेह PM करिता पाठवले आहेत. क्रॉस खुनाचे गुन्हे दाखल करन्याचे काम सुरु असून आरोपी जखमी असल्याने अटक बाकी आहे.

हेही वाचा

उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती

महत्त्वाच्या बातम्या

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget