एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Crime : सहकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित

Mumbai Crime : सहकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेमुळे वरळी पोलीस वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime : सहकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) निलंबित करण्यात आलं आहे. अभिजीत परब असं निलंबित पोलीस हवालदाराचं नाव आहे. ते मुंबई पोलिसांच्या स्थानिक आर्म युनिटमध्ये संलग्न आहेत. आरोपी पोलीस हवालदार आणि तक्रारदार हवालदार एकाच भागात राहतात. या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये (Worli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेमुळे वरळी पोलीस वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी तक्रारदार हवालदार सदस्य असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक व्हिडीओ आला होता. हा व्हिडीओ आपल्या पत्नीचा असून अभिजीत परबने तो शूट केल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा व्हिडीओ कोणी पसरवला हे स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

विभागीय चौकशी आणि आरोपी हवालदाराला निलंबित करण्याचा निर्णय 

पोलिसांच्या माहितीनुसार, "दरम्यान प्रथमदर्शनी अभिजीत परबचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर वरळी पोलिसांनी त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 41अ अन्वये पोलीस अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती, त्यानंतर त्याची विभागीय चौकशी करावी आणि चौकशी प्रलंबित असताना त्याला निलंबित करावे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला."

अभिजीत परब यांचा गुन्हा गंभीर आणि महिलांविरोधातील असल्याने आणि त्यांचे वर्तन अनैतिक असल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. "आम्ही संबंधित महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ कोणी पसरवला याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

पत्नीला माहेरी पाठवलं आणि अभिजीत परबविरोधात तक्रार दाखल केली

दुसरीकडे बदनामीच्या भीतीने पत्नीने तक्रार करण्यास नकार दिला होता. परंतु पोलीस हवालदाराने त्याच्या सासरच्या मंडळींना घरी बोलावले. संबंधित प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि तिला घरी घेऊन जा असं सांगितलं. पत्नीला माहेरी पाठवल्यानंतर हवालदाराने वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरुन अभिजीत परब आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबर धारकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 500 (बदनामी), 292 (अश्लील साहित्य प्रसारित करणे इ.), 293 (तरुणांना अश्लील कंटेट प्रसारित करणे), 34 (सामान्य हेतू) आणि 67 A (इलेक्ट्रॉनिक स्वरुपात लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कृत्य असलेली सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare Navi Delhi : जास्त ठिकाणी लढलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या - सुनील तटकरेAjit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हातीMarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोपABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Eknath Shinde Health: एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणाले...
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित
2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, बाबा वेंगांचं भाकित
Embed widget