Mumbai Crime News : अवघ्या तीन हजार रुपयांसाठी नातवानं आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वडाळा येथे ही धक्कादायक घटना घडली. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. यातील फरार नातवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


अवघ्या तीन हजार रुपयांसाठी एका नातवाने आपल्या आजोबांची हत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. यातील फरार असलेला 21 वर्षीय नातू सुशांत राम सातपुते याला गुन्हे कक्षाच्या मालमत्ता विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 75 वर्ष वय असलेले लक्ष्मण घुगे हे वडाळा येथील कोरबा मिठागर येथे आपली पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीचा सुशांत हा मुलगा आहे. सुशांत हा आजोबांच्या घरी येत जात असे. त्याला सिगरेटसह इतर व्यसनंही होती. यासाठी त्यानं त्याचे आजोबा लक्ष्मण यांच्याकडून काही दिवसांपूर्वी 3000 रुपये उधार घेतले होते. याबाबत लक्ष्मण हे वारंवार सुशांतकडे ते पाचशे रुपये मागत असत. लक्ष्मण घरी एकटे असताना सुशांत त्यांच्याघरी आला होता. लक्ष्मण यांनी त्याच्याकडे उधार घेतलेले पैसे मागितले. यावर सुशांत प्रचंड संतापला आणि त्यानं बांबूने लक्ष्मण यांना मारहाण केली. 


नातवानं केलेल्या मारहाणीत डोक्यावर आघात झाल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शेजाऱ्यांनी केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही मारहाण करून सुशांतनं मुंबई बाहेर पळ काढला होता. वडाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. मात्र मालमत्ता कक्षानं विविध पथकं तयार करून या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. मालमत्ता कक्षाच्या पथकाने नवी मुंबई मधील विविध ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अखेर या आरोपीला शोधून काढलं. पनवेल रेल्वे स्थानकच्या बाहेर झोपलेले असताना पोलिसांनी त्याला शिताफीनं ताब्यात घेतलं आणि अटक केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा