Dombivli Latest Crime News : पाच दिवसांपूर्वी भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथील दत्त नगर परिसरात घडली होती. हल्लेखोर पती सोमनाथ देवकर विरोधात डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा केला. मात्र सोमनाथ फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. याच दरम्यान या फरार सोमनाथने रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी छातीवर बंदुकीने गोळी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ सोमनाथ व पत्नी वंदना राहतात.चारित्र्यावर संशय आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. या वादातून आठ तारखेला पुन्हा सोमनाथने पत्नीला मारहाण केली याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर सोमनाथने भररस्त्यात चाकूने वार करत तिला जखमी केलं होतं. जखमी पत्नी वंदना हिला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमनाथ घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. आता याच दरम्यान सोमनाथ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. त्याच्याजवळील बंदुकीने छातीवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसानी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान सोमनाथ याला उपचारासाठी डोंबिवली एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पसार झालेला सोमनाथ नाशिक येथे लपून बसला होता. आज सकाळी तो घरी आला व पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपीने हे पिस्तुल मध्य प्रदेश येथून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.