Valentine's Day 2022 : अनेकांनी व्हॉलेंटाईन वीक साजरा केला.  रोज डे, किस डे, प्रपोज डे, चॉकलेट दिवस, टेडी डे ,प्रॉमिस डे, हग डे हे सर्व डे साजरे करण्यात आले आता या व्हॉलेंटाईन वीकचा शेवट हा आज होणार आहे. आज 'व्हॅलेंटाईन डे'ला (Valentines Day) अनेक जोडपी आपल्या पार्टनरला गिफ्ट देतात. पण जे कपल्स हे लाँग डिस्टन्स   रिलेशनशिपमध्ये आहेत, अशांना 'व्हॅलेंटाईन डे' कसा साजरा करावा? असा प्रश्न पडत असेल. लाँग  डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये  असणारे कपल या टिप्स फॉलो करू शकतात. 


पत्र लिहा
व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम असे अॅप्स लॉन्च झाल्यापासून पत्र लिहिणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाँग  डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या पत्त्यावर प्रेम पत्र लिहून पाठवू शकता. या पत्रात तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दलच्या भावना व्यक्त करू शकता तसेच कविता देखील लिहू शकता. 


गाणं म्हणून दाखवा 
जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही एखाद रोमँटिक गाणं रेकोर्ड करून ते तुमच्या पार्टनरला पाठवू शकता. तसेच व्हिडीओ कॉल करून देखील तुम्ही गाणं गाऊन दाखवू शकता. 
 
व्हिडीओ कॉल करा 
'व्हॅलेंटाईन डे'ला तुम्ही पार्टनरला व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा देऊ शकता.  तसेच व्हिडीओ कॉल करून तुम्ही तुमच्या पार्टरबद्दलच्या भावना व्यक्त करू शकता. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha