एक्स्प्लोर

Mumbai Crime Case : नेस्को सेंटर पार्टी प्रकरणाची व्याप्ती वाढली, कॉन्सर्टमधील सुरक्षारक्षकाला अटक, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर बोट

Goregaon Nesco Centre case: नेस्को येथील ड्रग्स प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एक संशयित आरोपीला अटक केली आहे. कॉन्सर्टमधील एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

Mumbai Crime Case : मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील (Goregaon Nesco Centre case) लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढल्याचे चित्र आहे. नेस्को, गोरेगाव येथील पार्टीत ड्रग्सचा प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. नेस्को येथील ड्रग्स प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एक संशयित आरोपीला अटक केली आहे. कॉन्सर्टमधील एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. हा सुरक्षारक्षक नेस्कोचा कर्मचारी नसून थर्ड पार्टी इव्हेंट आयोजकाकडून नियुक्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Mumbai Crime : तपासाचा फोकस आता सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांकडे

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, याच सुरक्षारक्षकाच्या मदतीने आयुष्य साहित्य याने विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकाला हजार ते दीड हजार रुपयांची लाच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुरक्षारक्षकाचा शोध घेतला असून आधी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या अटकेमुळे नेस्को ड्रग्स प्रकरणातील तपासाचा फोकस आता सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांकडे वळण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime Case : नेस्को सेंटरमधील प्रकरणानंतर मुंबई पोलिसांकडून नवीन नियमावली जारी

दुसरीकडे, गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पार्टीचा घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. 2000 पेक्षा जास्त लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये गर्दी होत असेल तर मुंबई पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पार्टीमध्ये ड्रग्सच्या ओव्हर डोज घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर मुंबई शहरात होणारा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलिसांची विशेष तयारी आणि नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यापुढे दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांचा म्युझिक कॉन्सर्ट-शो असेल तर मुंबई पोलिसांकडून त्या म्युझिक कॉन्सर्टला तीन पथकांच्या नेमणूक करण्यात येणार आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मुंबई पोलिसांचा अमली पदार्थ प्रतिबंधक पथक (anti drug squad), छेडछाड प्रतिबंधक पथक(Anti Eve testing squad), चोरी प्रतिबंधक पथक(anti theft squad) अशा तीन पथकांचे नेमणूक करण्यात येणार आहे.

Mumbai Police : नियमांचा भंग केला तर मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाई

दरम्यान, या प्रत्येक पथकामध्ये एक अधिकारी चार अंमलदार असा पाच जणांचा नेमणूक असणार आहे. त्यासोबत इव्हेंट ऑर्गनायझरकडून इव्हेंटचा पास पोलिसांच्या एनओसी भेटल्यानंतरच ऑनलाईन आणि ऑफलाईन विकता येणार आहे. या नियमांचा जर कुठलाही इव्हेंट ऑर्गनायझर भंग केला तर त्याच्यावर मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget