Crime News: साक्षीदार बनून चूक केलीस.. भाईंदरमध्ये दोन कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, भरदिवसा वादाचं रुपांतर चाकूहल्ल्यात, गुन्हा दाखल
mumbai crime: साक्षीदार झाल्याच्या रागातून दोन कुटुंबामध्ये वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. शेवटी चाकूहल्ला करेपर्यंत प्रकरण पुढे गेल्याने पोलिसांना मध्ये पडावं लागलं आहे.

Mumbai: केवळ साक्षीदार झाल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत गेला असून, या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 एप्रिल रोजी आर.एन.पी. पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तू दुबे प्रकरणात साक्ष देऊन चूक केलीस म्हणत हा वाद सुरु झाला. शेवटी वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. शेवटी चाकूहल्ला करेपर्यंत प्रकरण पुढे गेल्याने पोलिसांना मध्ये पडावं लागलं आहे. (Crime News)
नक्की घडले काय?
मुंबईत भाईंदर पूर्वेतील आर.एन.पी. पार्क परिसरात केवळ साक्षीदार झाल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला.संजय भगवतीप्रसाद श्रीवास्तव हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले असताना, त्यांची शेजारी नीतू खंडेलवाल हिने त्यांना अडवून "तू दुबे प्रकरणात साक्षीदार बनून चूक केली आहेस, मी तुला पाहून घेईन," अशी धमकी दिली. त्यानंतर तिचा मुलगा रोहित खंडेलवाल घराबाहेर आला आणि शाब्दिक वादावादीचं रुपांतर मारहाणीत झालं. शेवटी वाद इतका टोकाला गेला की श्रीवास्तव यांची मुले वाद मिटवण्यासाठी आली असता दोन्ही कुटुंबात हातापायी झाली.गोंधळात रोहित जमिनीवर पडला आणि डोक्याला लागून तो संतप्त झाला. त्याने जमिनीवरून दगड उचलून अनंत श्रीवास्तव या युवकावर फेकला आणि नंतर घरी जाऊन चाकू घेऊन परत आला. त्याने संजय श्रीवास्तव यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही, मात्र भरदिवसा चाकू घेऊन घराबाहेर आल्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले असून, गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत असून पुढील तपास सुरु आहे.
अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस, पुण्यातील सोसायटीत राडा
अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून पुण्यातील सोसायटीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी सोसायटीतील सभासदांना मारहाण केली असून आरोपीकडून महिला सदस्यांचे केस ओढत मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीने महिलांना शिवीगाळ करत हाणामारी केल्याचे समोर आल्याने परिसरात मोठा गोंधळ झाला. धायरी भागातील सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मल्लिका समीर पायगुडे गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 11 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)
हेही वाचा:























