विदेशी दारूत पाण्याची भेसळ; दारूच्या बाटलीत पाणी टाकून पुन्हा सीलबंद करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Thane News : दारूच्या बाटलीत पाणी टाकून पुन्हा सीलबंद करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दारूत पाण्याची मिलावट करण्याचा हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे : विदेशी दारूत (foreign liquor) पाण्याची (Water) मिलावट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दारूच्या बाटलीत पाणी टाकून पुन्हा सीलबंद करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दारूत पाणी मिसळण्याचा हा प्रकार ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असल्याचे बोलले जात आहे.
झटपट पैसे कमविण्याच्या नादात विविध गोरखधंदे शोधून त्यातून पैसे मिळविले जात आहेत. असाच या गोरखधंद्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या मोठ्या बाटल्यांमधून दारू काढून ती इतर ठिकाणी विक्री करत असल्याचे उघड झाले आहेत.
विदेशी दारू काढून त्या ऐवजी तेवढेच पाणी
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी दारूची साठवणूक करणारी गोदामे आहेत. या गोदामांतून दररोज बहुतांश टेम्पोमधून जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बार रेस्टारेंटमध्ये विदेशी दारूची वाहतूक केली जाते. मात्र गोदामातून वाहतूक करणारी गाडी निघताच अंधाराचा फायदा घेत टेम्पोमध्ये विदेशी दारूच्या पॅक बाटलीचे झाकण चलाखीने उघडून त्यामधून काही विदेशी दारू काढून त्या ऐवजी तेवढेच पाणी टाकून बाटली पुन्हा सीलबंद करण्यात येत असल्याचे व्हायरल व्हिडीओमधून दिसून येत आहे.
गोरखधंद्याला आळा घालणार का?
दरम्यान, विदेशी दारूच्या बाटलीत पाणी टाकून त्या बाटलीतील दारूच्या विक्रीचा गोरख धंदा विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा व्हायरल व्हिडीओच्या मध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे अशा गोरखधंद्याला दारू उत्पादन शुल्क आणि पोलिस प्रशासन आळा घालणार का? असा प्रश्न या व्हायरल व्हिडीओमुळे उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे ज्या विदेशी दारूला मद्यपीकडून अधिक मागणी आहे. त्यामध्ये मॅकडोल, रॉयलचॅलेंज, ब्लेंडरस्प्राईट अशा दारूच्या बाटलीतून दारू काढून त्यामध्ये पाणी टाकले जात असल्याचे व्हायरल व्हिडीओ दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या