एक्स्प्लोर

कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 

Rajasthan Crime News : वैयक्तिक वैमनस्यातून कुटुंबाचा बदला घेण्यासाठी जैसलमेरमध्ये एका तरुणाने स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला.

Rajasthan Crime News : राजस्थानच्या जैसलमेर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून कुटुंबाचा बदला घेण्यासाठी जैसलमेरमध्ये एका तरुणाने स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो मृतदेह शेजाऱ्यांच्या स्वयंपाकघरात आणून जाळला. किचनमध्ये मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडा पडला. 

पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सिंह याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने वैयक्तिक वैमनस्यातून शेजारी असणाऱ्या हेमसिंह यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी हा बनाव आखला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी हेमसिंह हे कुटुंबासह शेजारच्या गावात गेले होते. रात्रभर ते तिकडेच थांबले होते. त्याच रात्री लक्ष्मण सिंह याने कट रचला. हेमसिंह आणि कुटुंबियांना  कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याची योजना आखली होती. त्यासाठी स्मशनभूमीतून पुरलेला मृतदेह आणला अन् किचनमध्ये जाळला. 

कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला

लक्ष्मण सिंह यानं प्लॅननुसार, 15 किमी दूर असलेल्या स्मशनभूमीत पोहचला.  दीड महिन्यापूर्वी पुरलेला रेवतरामचा मृतदेह स्मशानभूमीतून बाहेर काढला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात हेमसिंगच्या घरातील स्वयंपाकघरात आणून जाळण्यात आला. लक्ष्मण सिंह याने मृतदेह 15 किमी बाईकवरुन आणला. त्यानंतर हेमसिंग यांच्या स्वयंपाकघरात तो जाळला गेला. त्यानंतर पोलिसांना कळवले. पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेवतरामचा मृतदेह दीड महिन्यापूर्वीच पुरण्यात आला होता. 

किचनमधीलच तेलानं जाळला मृतदेह 

लक्ष्मण सिंह यानं मध्यरात्री स्मशानभूमीपासून 15 किलोमीटर अंतरावरून बाईकवरुन मृतदेह घेऊन हेमसिंहचे घर गाठले. त्यानंतर स्वयंपाकघरात तेल शिंपडून मृतदेह जाळला. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली. हा सर्व प्लॅन पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण सिंह याला पहाटेचे पाच वाजले होते.  मृतदेह दुचाकीवर घेऊन लक्ष्णण हेमसिंहच्या घरी पोहोचला तेव्हा गावातील एका व्यक्तीने पाहिले होते. त्यानंतर त्याने इतर गावकऱ्यांना माहिती दिली. सकाळी हेमसिंहचे नातेवाईक घरी पोहोचले असता गावकऱ्यांनी त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.  त्यानंतर आरोपी लक्ष्मण सिंह याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

आणखी वाचा :

VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget