Malegaon Vote Jihad : मालेगाव व्होट जिहाद प्रकरणात मोठी अपडेट, ATS ने तपास हाती घेताच किरीट सोमय्यांनी दिली धक्कादायक माहिती
Kirit Somaiya : मालेगावच्या नामको बँकेच्या शाखेत आणि महाराष्ट्र बँकेत 12 बेरोजगार तरुणांच्या खात्यात सुमारे 114 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

मुंबई : मालेगावच्या नामको बँकेच्या (Namco Bank) शाखेत आणि महाराष्ट्र बँकेत (Maharashtra Bank) 12 बेरोजगार तरुणांच्या खात्यात सुमारे 114 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार व्होट जिहादचा (Vote Jihad) असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावात भेट देत फसवणूक झालेल्या तरुणांची भेट देखील घेतली होती. आता मालेगाव व्होट जिहाद पैसा घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ATS विभागाने या घोटाळ्याच्या तपासास सुरुवात केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार आहे.
किरीट सोमय्या यांनी एक्स या समाजमाध्यमावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, मालेगाव व्होट जिहाद घोटाळा प्रकरणात सिराज मोहम्मदने नाशिक मर्चंट बँकमध्ये ज्या 14 बेनामी कंपन्यांची खाती उघडली. त्यात 21 राज्यांतून 255 कंपन्यांमधून 112 कोटी 71 लाख 97 हजार 780 जमा झाले आहेत. या व्यतिरिक्त बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असेच 5 बेनामी खाती उघडण्यात आली. त्यात 53 कोटी 75 लाखांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या ATS विभागाने हा तपास त्यांच्या हातात घेतला आहे. या 255 बोगस कंपन्यांमधून जो पैसा आला त्याची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या एटीएसच्या तपासात नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मालेगांव वोट जिहाद का पैसा घोटाला!
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 14, 2024
सिराज मोहम्मद ने नासिक मर्चेंट बैंक मै जो 14 बेनामी कंपनियों के अकाउंट खोले थे उनमें हिंदुस्तान के 21 राज्यों के 255 बोगस कंपनियों के बैंक अकाउंट से ₹112 करोड़ 71 लाख 97 हजार 780 जमा हुए।@BJP4India pic.twitter.com/nMNi1ntfO7
किरीट सोमय्यांचा सज्जाद नोमानींवर गंभीर आरोप
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावात भेट दिली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सज्जाद नोमानी यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, नामको बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून काढण्यात आलेली 114 कोटी रुपयांची रक्कम व्होट जिहादचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्यासह मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांना वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मालेगाव केंद्र म्हणून व्होट जिहादसाठी वापरले गेले, असेही त्यांनी म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

