एक्स्प्लोर

टॉप अभिनेत्रीचा प्रसिद्ध उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप, ज्वेलरी बिझनेसमन अटकेत

Who is Boby Chemmanur : प्रसिद्ध अभिनेत्रीने ज्वेलरी बिझनेसमनवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Honey Rose Sexual Harassment Case : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कास्टिंग काऊच, अभिनेत्रींचे लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या घटना समोर येतात. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याव्यतिरिक्त इंडस्ट्रीशी संबंधित इतरही काही व्यक्तींनी अभिनेत्रीचे किंवा तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या अनेक वेळा आल्या आहेत. आता एका टॉप अभिनेत्रीने एका व्यावसायिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी व्यावसायिकालाही अटक केली आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप

अभिनेत्रीने एका ज्वेलरी ब्रँडचा मालक असलेल्या उद्योपपतीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री हनी रोझ हिने व्यावसायिकाविरोधात तक्रा केली आहे. अभिनेत्री हनी रोझ मल्याळम चित्रपट उद्योगातील टॉप अभिनेत्रींपैंकी एक आहे. हेमा समितीच्या अहवालावरून मल्याळम चित्रपटसृष्टीतून लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

ज्वेलरी बिझनेसमन अटकेत

मल्याळ अभिनेत्री हनी रोझ हिने केरळचे दिग्गज उद्योगपती बॉबी चमनूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, बॉबीने तिच्यासोबत अनेक वेळा असभ्य वर्तन केलं. अश्लील संदेश, तसेच आक्षेपार्ह आणि अपमानास्पद कमेंट केल्याचाही दावा तिने केला आहे. हनी रोझने अनेक सोशल मीडिया पोस्टद्वारे उद्योगपती बॉबी चमनूरवर आरोप केले. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की बॉबीने अनेक वेळा आक्षेपार्ह कमेंट केल्या. अश्लील कृत्ये केली. 

कोण आहे बॉबी चमनूर?

पोलिसांनी हनी रोझच्या या पोस्टची दखल घेतली आणि बॉबी चमनूरविरुद्ध तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी केरळमधील वायनाड येथून बॉबीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. बॉबी चमनूर हे केरळचे एक मोठे उद्योगपती आणि 'चमनूर इंटरनॅशनल ज्वेलर्स'चे मालक आहेत. याशिवाय बॉबीचे इतरही अनेक व्यवसाय आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Honey Rose (@honeyroseinsta)

उद्योगपतीने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, बॉबी चमनूर यांनी हनी रोझचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने म्हटलं आहे की, हनी रोझने त्यांच्या कंपनीशी संबंधित दोन कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्याने हनीसोबत डान्स केला, पण मी तिच्यावर कमेंट केली नाही. बॉबी चमनूरने असेही म्हटले की जर तिला काही आक्षेप असता तर तिने ते तेव्हाच सांगितलं असतं. इतक्या महिन्यांनी ती हे का सांगत आहे, असा सवाल यावेळी त्याने उपस्थित केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
Embed widget