सांगली : जेवण दिले नाही म्हणून आईचा दगड व लोखंडी फुंकणीने मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावात घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आगळगाव येथील पाटील मळ्यात राहणाऱ्या राजाक्का ज्ञानू जाधव (वय 70) या महिलेला मुलगा दशरथ जाधव यांने जेवण दिले नसल्याचे कारणावरून दगड आणि लोखंडी फुंकणीने जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला. संशयित मुलगा दारूचा व्यसनी असून रोज तो आईशी भांडत होता व मारहाण करीत होता अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. या प्रकरणी नातू गणेश भोसले यांनी तक्रार दिली असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावातील दशरथ ज्ञानु जाधव याचे स्वतःच्या आईसोबत भांडण झाले. यावेळी भांडण विकोपाला गेल्यानंतर दशरथने आईच्या डोक्यामध्ये दगड, वीट आणि लोखंडी फुंकणीने मारायला सुरुवात केली. या मारहाणीत दशरथच्या आई राजाक्का या गंभीर जखमी झाल्या. शेजाऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी राजाक्का जाधव यांना मिरज मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
राजाक्का जाधव यांच्या नातूला ही बाब कळताच त्याने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला ही बाब कळवली. कवठेमहांकाळ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलिसांना घटनास्थळी दगड,वीट आणि लोखंडी फुंकणी आढळली असून पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतलेत. पोलिसांनी आरोपी दशरथला ताब्यात घेतलें असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.
संबंधित बातम्या :
- धक्कादायक! जावयाने सासऱ्याला कालव्यात फेकून केली हत्या, भावाचा मृतदेह बाहेर काढताना लहान भावाचाही मृत्यू
- धक्कादायक! निर्मनुष्य ठिकाणी नेत सात वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण, पोलिसांकडून 'सिरीयल मोलेस्टर'ला बेड्या
- Mumbai Crime News : आधी प्रेयसीवर हल्ला, मग बचावासाठी आलेल्या पोलिसावरही हल्ला; आरोपी अटकेत