Mumbai Crime News : वडाळ्यातील बरकत अली नाका येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीला प्रियकाराच्या जीवघेण्या हल्ल्यापासून वाचवताना पोलीस जखमी झाला आहे. आई-वडिलांनी लग्नाला नकार दिल्यानं पीडित प्रियकरानं तिच्यावर धारदार चाकूनं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंदोबस्तावर तैनात असलेला पोलीस मयूर पाटील मुलीला वाचवण्यासाठी धावून आले. तरुणीला वाचवण्यात पोलिसाला यश आलं. पण तिला वाचवताना चाकूचा एक वार पोलिसावरही झाला. या घटनेत पोलीस जखमी झाला आहे.  


मुंबईतील वडाळा येथील बरकत अली परिसरात वास्तव्यास असणारी तरुणी कामावर जाण्यासाठी पायी चालत जात होती. त्यावेळी अनिल बाबर (31) यानं तिचा पाठलाग केला आणि सानिका रस्ता ओलांडत असताना त्यानं तिच्यावर चाकूनं पाठीवर हल्ला केला. हा सर्व प्रकार वडाळा परिसरात तैनात असणाऱ्या वडाळा पोलीस ठाण्याचे अंमलदार मयुर पाटील यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ धाव घेत अनिलला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरुणीला वाचवलं. पण या घटनेत अनिल पाटीलनं पोलिसावर हल्ला केला. पण तरिही पोलिसानं तरुणीचा जीव वाचवला. हा प्रकार कळताच तिथे तैनात असलेल्या अन्य पोलिसांनी तात्काळ अनिलला पकडून जखमी सानिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास बरकत अली नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांचे प्रेमसंबंध होते. परंतु, तरुणीच्या आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून प्रियकरानं पीडितेवर धारदार चाकूनं हल्ला केला. त्यावेळी तरुणीला वाचवण्यासाठी वडाळा पोलीस ठाण्याचे अंमलदार मयुर पाटील यांनी धाव घेतली. झटापटीत एक वार त्यांच्यावर झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :