Bhandara District Crime News: भंडारा जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. येथे एका जयावयाने सासऱ्याला कालव्यात धक्का. ज्यामध्ये सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान मोठ्या भावाचा मृतदेह पाहून भावनिक झालेल्या लहान भावाने कालव्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांचा देखील मृत्यू झाल्याची ही विचित्र घटना भंडारा येथील पनवी तालुक्यातील सिंधी येथे घडली आहे. हरी गोविंदा नागपूरे (वय 65) आणि चंद्रभाग गोविंदा नागपूरे (वय 55) अशी कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या या दोघा भावंडाची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोप जयावयाला अटक केली आहे. नारायण हटवार (वय 40) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, हरी हे रविवारी पवनी येथे काही कामानिमित्त आले होते. आपलं काम झाल्यानंतर ते घरी परतण्यासाठी पवनी बस स्थानकावर उभे होते. हरी हे बसची वाट पाहत असताना तिथे त्यांना त्यांचा जावई नारायण हटवार भेटला. यावेळी नारायण याने आपल्या सासऱ्याला मी घराकडे जात असल्याचं सांगत तुम्हाला ही गावाकडे सोडतो, असं म्हणाला. यानंतर नारायण याने त्यांना आपल्यासोबत दुचाकीवर बसण्यास सांगितलं. हे दोघे गावाकडे जात असताना रस्त्यात त्यांचं भांडण झालं. यावेळी जावई नारायण याने हरी यांना, 'तुमची मुलगी काही झाल्यास वारंवार घर सोडून जाते', असं म्हणाला. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर रागाच्या भरात असलेल्या नारायण याने गाडी चालवत असताना रस्त्यातच असलेल्या गोसेखुर्दच्या उजव्या कालवात हरी यांना ढकलून दिले. कालव्यात पडताच हरी यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.   


भावाचा मृतदेह बाहेर काढताना लहान भावाचा मृत्यू 


यानंतर सोमवारी सकाळी हरी यांचा लहान भाऊ चंद्रभाग नागपूरे हे याच कालव्याच्या शेजारून जात असताना त्यांना आपल्या भावाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. आपल्या भावाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहताच कसलाही विचार न करत ते कालव्यात उतरले. मात्र स्वतःच्या मोठ्या भावाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढत असताना त्यांचा ही यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.