Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood)  लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच सोनू शिर्डीला गेला. शिर्डीला असताना सोनूनं साईकृष्ण या दुकानाला भेट दिली. या दुकानामध्ये चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सोनूनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो या दुकानाची माहिती देताना दिसत आहे. दुकानाची माहिती देता असताना तो आलेल्या ग्राहकांना ऊसाचा रस स्वत: बनवून देताना दिसत आहे. 


व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो, 'हे आहे साईकृष्णा दुकान, हे एखाद्या शोरूमसारखं आहे. इथे चहा पण मिळतो.' पुढे सोनू आलेल्या ग्राहकांना  'तुम्हाला काय पाहिजे?', असा विचारतो. त्यानंतर ते ग्राहक सोनूला ऊसाचा रस मागतात. नंतर सोनू स्वत:च्या हातानं ऊसाच्या रसाची मशीन सुरू करतो आणि रस तयार करायला सुरूवात करतो. या व्हिडीओला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'माय रिअल हीरो, सर मला तुमचा आभिमान वाटतो.'






'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.


 हेही वाचा :