Chhatrapati Sambhaji Nagar : बायको माहेरी निघून गेली, एकट्या पडलेल्या पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Chhatrapati Sambhaji Nagar : ही घटना वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नी विरहामुळे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. समाधान बाळनाथ घायवट (वय 35 वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पानगव्हाण येथील समाधान घायवट याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरात धिंगाना घालून पत्नीसह आई वडिलांना मारहाण करीत असत. सततच्या या मारहाणीला कंटाळून त्याची पत्नी गेल्या दीड वर्षांपासून तीन मुलींना घेऊन माहेरी राहत होती. पत्नी माहेरी असल्याने समाधानला विरह सहन झाला नाही. तो 15 मेपासून घरातून निघून गेला होता. त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील पठारे यांच्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने शेतकऱ्याने आत डोकावून पाहिले असता, एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो समाधान घायवट याचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. कुजलेला असल्याने जागेवरच बोरसर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत वैजापूर शहरातील यशवंत कॉलनी भागात राहणाऱ्या एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तेजस सोपान काळे (वय 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री जेवण करून तेजस काळे याच्यासह संपूर्ण कटंब झोपी गेले. होते. मात्र तेजसने रात्री गळफास घेऊन जीवन संपविले. सकाळी तेजस लवकर उठला नसल्याने कुटुंबियांनी खोलीत पाहिले असता, तो साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. हे पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तेजसने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
संभाजीनगर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, घटनास्थळी पोलीस दाखल