Crime News : कुरियर बॉय असल्याचं सांगून ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरात घुसून तिचे हात, पाय व तोंड बांधून जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चार आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे.


4 जण घरात घुसले, वृद्ध महिलेचे हातपाय बांधले...


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 7 मे 2022 रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास वृद्ध महिलेच्या घराच्या दरवजाची बेल वाजली, त्यावेळी कुरियर बॉय असल्याचं भासवून चक्क चार जण घरात घुसले, आणि वृद्ध महिलेचे हात, पाय व तोंड बांधून जबरी चोरी केल्याची घटना घडली, या दरम्यान सोन्याचे दागिने व रोख रक्कम अस एकूण 1 लाख 87 हजार 500 रुपयांच्या मालमत्तेची जबरी चोरी करत ते तिघेही पळून गेले.  


मुंबई क्राईम ब्रांचचे पथक युपीला रवाना
मुंबई क्राईम ब्रांच युनिट 11 (कांदिवली यूनिट) यांनी सीसीटीव्ही व आधुनिक पद्धतीने माहिती गोळा करून आरोपींचा शोध लावला. हे आरोपी सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश तिकडचे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रांचचे पथक युपीला रवाना झाले आणि सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतलं. या दरम्यान चार आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपींना 27 मे रोजी अटक करून ट्रांसिट रिमांडवर मुंबईला आणले, तसेच मुंबई न्यायालयात त्यांना हजर करणार येणार असल्याचे समजते.


संबंधित बातम्या