Somvati Amavasya : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही अमावस्या 'मोठी अमावस्या' म्हणून ओळखली जाते. यावेळी सोमवार, 30 मे रोजी म्हणजेच आजची ही सोमवती अमावस्या आहे.


आज सोमवती आमावस्या, जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा
जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती आमावस्याला भरते. आज आमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक कालपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील. दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल. सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती. पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा भरणार आहे. यात्रेला 4 ते 5 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.


विशेष योग, ही कामे जरूर करा!
यावेळी 30 मे रोजी शनि जयंती आणि सोमवती अमावस्या या महासंयोगासह दोन विशेष योगही बनत आहेत. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. त्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.


पंचांगानुसार शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. यंदा शनि जयंती सोमवार, 30 मे रोजी येत आहे. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सुकर्म योग देखील तयार होत आहेत. अशा स्थितीत शनिदेवाची उपासना अधिक पुण्यपूर्ण आणि फलदायी ठरेल.


अमावास्येला व्रत पूजा करून पितरांना तिळाचे पाणी अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. भारतीय ज्योतिषशास्त्रात  योग, नक्षत्र, दिवस, इत्यादींच्या आधारे या अमावस्येचे महत्त्व सांगितले आहे. 


जर ही सोमवार किंवा शनिवारी आली तर त्या तिथीचे महत्त्व वाढते आणि चंद्र प्रबळ होतो, या वेळी सोमवारी अमावस्या असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या म्हटले जाते.


या अमावास्येला चंद्र, बुध, सूर्य हे वृषभ राशीत राहतील. चंद्र आणि बुध सूर्य योग बनत आहेत, चंद्र आणि सूर्य एकत्र असणे पूर्वजांच्या आत्म्यास शांती प्रदान करते. या दृष्टीकोनातून या दिवशी देव ऋषी पितृ तर्पण तीर्थ, पितरांसाठी केलेले श्राद्ध, पिंडदान अत्यंत महत्त्वाचे ठरते.


शनि जयंती 2022 तिथी शुभ मुहूर्त




 




  • ज्येष्ठ अमावस्या तिथीची सुरुवात : 29 मे, रविवार, दुपारी 2.54 मिनीटे

  • ज्येष्ठ अमावस्या समाप्ती : 30 मे, सोमवार, दुपारी 04:59 वाजता

  • सोमवती अमावस्या 2022: स्नान आणि दान, 30 मे रोजी सकाळपासून


शनि जयंतीला सोमवती अमावस्या व्रत


यावेळी शनि जयंती म्हणजेच ज्येष्ठ अमावस्या सोमवारी नदीत स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करून दान करावे. यामुळे फलदायी ठरेल 


सर्वार्थ सिद्धी योगात शनी जयंती साजरी होईल


शनि जयंतीच्या दिवशी म्हणजेच 30 मे रोजी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07:12 पासून सुरू होईल आणि मंगळवारी, 31 मे रोजी सकाळी 05:24 पर्यंत चालू राहील. या शुभ मुहूर्तावर शनिदेवाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. शास्त्रात सर्वार्थ सिद्धी योगास कामात यश मिळते असे सांगितले आहे आणि या योगात केलेली उपासना उत्तम फळ देते.









हे देखील वाचा