Yavatmal news update : न्यायालयात दाखल झालेल्या छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयात वकिलांकडून आपली बाजू मांडताना आपण पाहतो. वकील आपल्याला न्याय प्रदान करण्यासाठी आपली बाजू न्यायाधिशांसमोर मांडतो. युक्तिवाद करताना दोन वकील एकमेकांसोबत चांगलेच भांडतात. हा बचाव करण्यासाठीचा एक भाग असतो. परंतु, यवतमाळ मधील आर्णी न्यायालयाच्या परिसरात जुन्या वादातून दोन वकीलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. दुर्गादास राठोड आणि राहुल ढोरे अशी हाणामारी झालेल्या वकिलांची नावे आहेत. 


राठोड आणि ढोरे यांच्यात जुना वाद उफाळून बार रुम मधेच बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाले. ही हाणामारी थोडी-तितकी नाही तर तीक्ष्ण हत्यारांचा वापर झाल्याने दोन्ही वकील चांगलेच जखमी झाले आहेत. या घटनेत दुर्गादास राठोड यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.   


तुंबळ हाणामारीत जखमी झालेल्या दोन्ही वकिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन दुर्गादास राठोड यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 


दरम्यान, या प्रकरणी राहुल ढोरे यांनी राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. इतरांच्या न्यायासाठी लढणारे वकीलच अपापसात भिडल्याने सर्वसामन्य जनतेने कसे वागावे? अशी चर्चा न्यायालयीन परिसरात सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव करीत आहे.   


निवडणुकीच्या वादातून हाणामारी 
दुर्गादास राठोड आणि राहुल ढोरे यांच्यात बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून वाद निर्माण झाला होत. त्यामुळे दोघेही एकमेकांविरोधात खुन्नस बाळगून होते. या खुन्नसचा आज आर्णी न्यायालयाच्या बार रूममध्ये उद्रेक झाला आणइ दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने न्यायालयासह आर्णी परिसरात खळबळ उडाली आहे. या मारामारीत दुर्गादास राठोड हे गंभीर जखमी झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Bhiwandi Crime News : भात शिजवला नसल्याच्या वादातून बायकोची हत्या; नवऱ्याला पोलिसांकडून अटक