30th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 30 मे चे दिनविशेष.


1987 : गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. 


गोवा हे भारतातील 26 वे घटकराज्य मान्य करण्यात आले. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


1950 : अभिनेते परेश रावल यांचा जन्म. 


परेश रावल हे एक भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1994 मध्ये सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. केतन मेहता यांच्या 'सरदार' या चित्रपटात ते स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांच्या मुख्य भूमिकेत दिसले होते.


1916 : प्रसिद्ध मराठी चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. 


दीनानाथ दलाल हे वाङ्‍मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक होते परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले.


1955 : नारायण मल्हार जोशी (भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक) यांचे निधन. 


नारायण मल्हार जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते. भारतातील कामगार संघटनांच्या विकासाचे रोपटे प्रथम जोशींनी लावले आणि कामगारांची प्रगती आणि कल्याण साधणारे अनेक कामगार कायदे संमत करण्यात मोठाच हातभार लावला.


महत्वाच्या बातम्या :