Mumbai Crime News : मुंबई कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत ड्रग्सची तस्करी होताना ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 27 किलो मारीजुआणा ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक करण्यात आल्याची माहिती समजत आहे.


 






तब्बल 27 किलोंचे ड्रग्ज जप्त


सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत आज कस्टमकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत तब्बल 27 किलोंचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याचा गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कस्टमने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, मुंबई कस्टम विभागाकडून या प्रकरणातील आरोपीच्या घरी सर्च ऑपरेशन केल्यानंतर 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि 7 किलो हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. 


ही गुन्हेगारी रोखायची कशी? पोलिसांसमोर मोठे आव्हान


या घटनेमुळे मुंबईतील अमली पदार्थांसंदर्भातील गुन्हेगारी वाढत आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे. या मोठ्या कारवाईनंतर ही गुन्हेगारी रोखायची कशी? याबाबत कस्टम अधिकारी तसेच मुंबई पोलिसांसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


महत्वाच्या इतर बातम्या


Raj Thackeray Majha katta : भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा : राज ठाकरे


Uday Samant : अखेर 'त्या' वक्तव्यावर उदय सामंतांनी मौन सोडले; म्हणाले...


CNG Price Hike: मुंबईत सीएनजी दरवाढीचा भडका; प्रतिकिलो सीएनजीसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये


देशात पुन्हा लॉकडाऊन? लोकांना मिळणार आणखी एक बूस्टर डोस? कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान करणार चर्चा