Corona Cases In India : देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत येत्या बुधवारी (27 एप्रिल) बैठक घेणार आहेत.. एका अहवालात म्हटलंय की, गेल्या दोन आठवड्यांत देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 


 


कोविड परिस्थितीवर पंतप्रधान करणार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी COVID-19 च्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान करतील, एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या दोन आठवड्यांत देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी (27 एप्रिल) पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस?
या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.


देशात कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या वाढली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाची 2,593 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्येतही वाढ झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांची संख्या 15,873 वर पोहोचली आहे. तर आकडेवारीनुसार, आता आपल्या देशात कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5,22,193 झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: