Latur Crime News : शेतीजमिनीच्या वादातून तीन सख्या भावंडांनी एकत्र येत बाप लेकाचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूर (Latur) जिल्ह्यातील उस्तुरी येथे घडली आहे. यामुळे लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उस्तुरी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमारेषेवर आहे. सुरेश बिराजदार हे आपले दोन मुले गणेश आणि साहिल यांच्यासह शेतात काम करत होते. शेतजमिनीवरून त्यांचा गेल्या काही काळापासून भावकीशी वाद सुरु होता. 


तीन जणांना बेड्या


या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार आणि लखन बिराजदार यांनी अचानक सुरेश बिराजदार आणि साहिल बिराजदार जबर मारहाण केली. या मारहाणीत सुरेश बिराजदार आणि त्यांचा 22 वर्षाचा मुलगा साहिल बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. तर गणेश बिराजदार हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  


औसा डेपोतील बस वाहकाला प्रवाशांची मारहाण 


दरम्यान, लातूर जिल्ह्यातील औसा डेपोची बस काल रात्री मुक्कामी बिरवली येथे होती. वाहक वाय बी कांबळे यांनी बसमध्ये असलेल्या एका प्रवासीला बसमध्ये नीट बसा असे सांगितले होते. यावरून संतप्त झालेल्या इसमाने आणि त्याच्या साथीदाराने दगडाने वाहक वाय बी कांबळे यांना जबर मारहाण केली. यामुळे वाहक गंभीर जखमी झाला आहे. वाहक वाय बी कांबळे यांच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे संतप्त झालेल्या औसा आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषी लोकांना अटक होत नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे, असा असा इशारा देत सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या   


Walmik Karad: वाल्मिक कराडचे ते दोन व्यक्ती विदेशात; सीआयडीकडे नवीन माहिती, गूढ आता उलघडणार?


Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल