Saif Ali Khan Stabbing Incident: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री दोन वाजता ही घटना घडली. त्यावेळ सर्वजण झोपले असतानाच अचानक घरात कुणीतरी घुसल्याचं समजलं. त्यावेळी सैफ धावला, त्यावेळी घुसखोरानं सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. सैफ महिला कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी मधे पडला, तर घुसखोरानं सैफवर हल्ला चढवला. अशातच त्यावेळी हल्लेखोरानं 1 कोटींची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. 


वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) दाखल करण्यात आलेल्या एफआईआरमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, संशयित जवळपास 30 वर्षांच्या आसपास असून एक सावळ्या रंगाचा व्यक्ती आहे. तो जवळच्याच सोसायटीच्या कॅम्पसमधून बिल्डिंगमध्ये घुसल्याचं सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो टी-शर्ट, जीन्स आणि खांद्यावर केशरी रंगाचं कापड घेतलेला दिसत होता.


56 वर्षीय महिला कर्मचारी एलियामा फिलिपकडे 1 कोटी मागितले 


सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या 56 वर्षांच्या एलियामा फिलिप या महिला कर्मचाऱ्यानं सर्वात आधी घुसखोराला पाहिलं. तिनं पोलिसांना सांगितलं की, "त्यानं 1 कोटी रुपये मागितले आणि ज्यावेळी मी विरोध केला, त्यावेळी त्यानं माझ्यावर दांड्यानं प्रहार केले  आणि ब्लेडनंही माझ्यावर वार केले." दरम्यान, हल्ला झाल्यानंतर फिलिपच्या मनगटावर आणि हातावर जखमा होत्या. 


मानेवर, खांद्यावर, पाठीवर आणि मनगटावर चाकूनं वार 


हल्लखोराच्या हल्ल्यानंतर नॅनी जुनूला जाग आली आणि तिनं मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून लगेचच सैफ अली खान त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि तिथे पोहोचला. त्यानंतर सैफ अली खाननं बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण, याचवेळी हल्लेखोरानं त्याच्या मानेवर, खांद्यावर, पाठीवर आणि मनगटावर चाकूनं वार केले. सैफ अली खानची मदत करण्यासाठी धावलेल्या एका स्टाफही यावेळी जखमी झाली. त्याच्यावर हल्ला केल्यानंतर लगेचच तो घुसखोर तिथून पळून गेला. 


सैफ अली खानच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत 


घटनेनंतर लगेचच सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, सैफच्या पाठीच्या मणक्यामध्ये अडीच इंचाचा चाकू अडकला होता, ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. तेथील डॉक्टरांनी पुष्टी केली की, त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या डाव्या हाताला झालेल्या दोन खोल जखमा प्लास्टिक सर्जरीद्वारे दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.


आरोपींच्या शोधासाठी 20 पथकं तैनात


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी 20 पथकं तयार करण्यात आली होती. सर्व पथकांना वेगवेगळी कामं सोपवण्यात आली आहेत. या प्रकरणी सध्या कसून तपास सुरू आहे. 


पाहा व्हिडीओ : Dr Nitin Dange on Saif Ali Khanजखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVE



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."