Nagpur Crime News : नागपूर येथील मानसोपचार तज्ञाने (Psychiatrist) उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागपूरमध्ये (Nagpur Crime News) एकच खळबळ उडाली आहे. आता नागपुरातील मानसोपचार तज्ञाविरोधात लैंगिक छळाचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 47 वर्षाचा विकृत मानसोपचार तज्ञ नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून मनोविकास केंद्र चालवत होता. या ठिकाणी तो विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करायचा. त्याने अनेक अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे नोव्हेंबर महिन्यात पोलिसांकडे आलेल्या एका तरुणीच्या तक्रारीतून स्पष्ट झाले होते.
लैंगिक छळाचा चौथा गुन्हा दाखल
मात्र नोव्हेंबर महिन्यात आलेल्या एका तक्रारी शिवाय कोणतीही पीडित तरुणी तक्रार देण्यासाठी समोर येत नव्हती. मात्र जानेवारी महिन्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या विकृत मानसोपचार तज्ञाविरोधात आणखी तीन तक्रारी समोर आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या मानसोपचार तज्ञाच्या मनोविकार केंद्रातून अनेक फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स सापडल्या होत्या. त्याच्या आधारावर पोलीस पुढचा तपास करत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणी पोलिसांनी आधीच या मानसोपचार तज्ञासह त्याच्या पत्नीलासह आरोपी केले आहे.
प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी तसेच काही महिला काउंसलरचा समावेश असलेली विशेष समिती गठित केली आहे. ही विशेष समिती याप्रकरणी आणखी काही तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी गेल्या काही वर्षात या मानसोपचार तज्ज्ञाकडे येणाऱ्यांची यादी बनवत त्यांच्याशी संपर्क करणे सुरू केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या