Crime News : एका लेडी कॉन्स्टेबलच्या पतीनं केलेलं एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटणारं कृत्य समोर आलं आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. बिहारमधील (Bihar News) भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका तरुणानं हवालदाराच्या पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपीनंही गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस खातंही हादरलं. डीआयजी, एसएसपी, सिटी एसपी, सिटी डीएसपी, डीएसपी लाइनसह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 


महिला कॉन्स्टेबल नीतू कुमारी बक्सर येथील असून पती पंकज कुमार आरा जिल्ह्यातील आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. नीतू लेडी कॉन्स्टेबल म्हणून काम करायच्या. त्यांची ड्युटी नवगचियामध्ये होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची बदली भागलपूरला झाली होती. भागलपूरला बदली झाल्यानंतर लेडी कॉन्स्टेबल नीतू यांना राहण्यासाठी सरकारी क्वॉर्टर मिळालं होतं. पत्नी नीतू हिला दिलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये बेरोजगार पती पंकज आई आणि दोन मुलांसह राहत होता. 


घटना घडल्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितलं की, नवरा बायकोमध्ये नेहमीच घरगुती कलह सुरू होता. कालांतरानं दोघांमधील भांडणं वाढली. पण नवरा बायकोमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. पतीनं सर्वात आधी लेडी कॉन्स्टेबल, आई आणि मुलांचा जीव घेतला, त्यानंतर त्यानं स्वतःही आत्महत्या केली. नवरा बायकोमधील वादा विकोपाला गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट मिळाली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावर एक सुसाईड नोटही आढळली आहे. पोलीस या प्रकरणी कसून तपास करत असून सर्व तपशील तपासात आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हत्याकांडानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचीही तयारी सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :                                     


चिठ्ठी लिहिली, सेल्फी काढला, मित्राला व्हॉट्सअॅपवर पाठवून दोघांनीही गंगेत उडी घेतली; कर्जाला त्रासलेल्या दाम्पत्यानं आयुष्य संपवलं


नवरा आणि प्रियकरानं रचला कट, 'दृश्यम' स्टाईल काढला काटा; नेमकं कसं उलगडलं महिलेच्या हत्येचं गूढ?