Health: जगभरात सध्या वाढणारे कर्करोगाचे वाढत जाणारे प्रमाण वाढले असून आता तरुणायीच्या Gen Z आणि मिलेनियल पिढीत कर्करोग वेगाने वाढत असल्याचे लॅन्सेटच्या एका आरोग्य अहवालातून समोर आलंय. या संशोधनानुसार  १७ प्रकारच्या कर्करोगाचा या पिढीला धोका असून  1990 मध्ये जन्मलेल्या पिढीमध्ये 2 ते 3 पटीने कर्करोग वाढला आहे. मिलेनिअल आणि Gen Z पिढीला कर्करोगाचा सर्वाधिक धोका कशामुळे वाढलाय? काय सांगितलंय या अहवालात?


लॅन्सेटने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील कर्करोगाचे प्रमाण नक्की कोणत्या वयोगटातील व्यक्तींवर आहे? हे तपासण्यात आले. यात Gen Z आणि मिलेनिअल पिढीमध्ये कर्करोगाचा धोका अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. लठ्ठपणा, आहारातील बदल आणि अपूरी झोप, तणाव आणि मानसिक आरोग्यामुळे हा धोका अधिक वाढला असल्याचं लॅन्सेटनं म्हटलंय.या अभ्यासासाठी कर्करोग रजिस्ट्रीमधून गोळा करण्यात आलेल्या जवळपास २४ दशलक्ष कर्करोग रुग्णांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या गटाने कर्करोगाचे प्रकार, लिंग आणि पीढीनिहाय डेटाची क्रमवारी लावली असता सामान्यपणे कर्करोग होणाऱ्या १७ प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण या दोन पिढ्यांमध्ये  वाढत आहे.  काय आहेत कारणं?


लठ्ठपणासह बदलत्या जीवनशैलीने वाढला धाेका


प्रक्रीया केलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनासह या पिढीत वाढलेले मद्यपान आणि धूम्रपान यामुळे कर्करोगाचा धोका वाढलाय. बदलत्या जीवनशैलीमुळे आतड्याचा आणि स्तनाचा कर्करोग यासारखे १० कॅन्सर लठ्ठपणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अमेरिका आणि जगभरात वाढती लठ्ठपणाच्या समस्येच्या संकट आहे. देशातील लठ्ठपणाचा दर वाढता असल्याने कर्करोगाची समस्या वाढत असल्याचे नोंदवण्यात आले.


तणाव आणि मानसिक आरोग्य


सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे, कामाच्या व्यापासह बेरोजगारी आणि इतर समस्यांमुळे येणारा तणाव आणि बिघडलेले मानसिक आरोग्य ढासल्याचे चित्र असून रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन कर्करोग वाढत असल्याचे समोर आले आहे. अनुवांशिक कारणांनीही कर्करोग वाढत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले असून Gen z आणि मिलेनियल तरुणांमध्ये यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढलं आहे.


कर्करोगात हा मुलांमध्ये आढळणारा आग्रगण्य प्रकार


भारतातील कर्करोग गुंतागुंतीचा आणि विकसित होत असताना पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग महिलांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढल्याचं दिसून आलंय.0-14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये, लिम्फॉइड ल्युकेमिया हा अग्रगण्य प्रकार आहे, ज्यामध्ये मुलांमध्ये 29.2% आणि मुलींमध्ये 24.2% प्रकरणे असतात. 2020 च्या तुलनेत 2025 पर्यंत कर्करोगाच्या घटनांमध्ये 12.8% वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय संशोधकांनी म्हटले आहे.


मद्यपान, धूम्रपानामुळे त्वचेसह वाढला हा कर्करोग


मिलेनियल्स पिढीतील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढल्यामुळे यकृत आणि अन्ननलिका कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे, अभ्यासातील लेखकांनी स्पष्ट केले आहे. पुरुषांमध्ये कपोसी सारकोमा (त्वचेच्या कर्करोगाचा प्रकार) आणि गुदद्वाराचा कर्करोग, या एचआयव्ही संसर्गाशी संबंधित दोन कर्करोगांचे प्रमाण अधिक आहे


हेही वाचा:


Gujarat : 'आत्महत्या करावीशी वाटतेय हो..' गुजरातमध्ये आत्महत्या हेल्पलाईनवर अचानक कॉल्स का वाढले? काय कारण आहे?