एक्स्प्लोर

Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा

Kudankulam Nuclear Power Plant: भारतातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित हजारो गोपनीय आणि संवेदनशील दस्तावेज डार्क वेबवर लीक झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय.

Kudankulam Nuclear Power Plant: भारतातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी (Kudankulam Nuclear Power Plant) संबंधित हजारो गोपनीय आणि संवेदनशील दस्तावेज डार्क वेबवर (Dark Web) लीक झाल्याचा धक्कादायक दावा एका रॅन्समवेअर (Ransomware) गटाने केला आहे. 'वर्ल्ड लीक्स' (World Leaks) नावाच्या सायबर गुन्हेगार टोळीने हा डेटा लीक केला असून, यामध्ये प्रकल्पाच्या अत्यंत संवेदनशील भागांचे ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती, महत्त्वपूर्ण बैठकींचे तपशील आणि विम्याच्या कागदपत्रांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. या सायबर हल्ल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kudankulam Nuclear Power Plant: अनिल अंबानींच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'चा डेटा चोरीला

'वर्ल्ड लीक्स'चा दावा आहे की, लीक झालेला हा सर्व डेटा कुडनकुलम प्रकल्पाचे कंत्राटदार असलेल्या अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'शी संबंधित आहे. रिलायन्सनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, थर्ड पार्टी डेटा सेंटर असलेल्या 'योट्टा'च्या सर्व्हरमधील डेटामध्ये घुसखोरी झाल्याची कबुली दिली आहे. रिलायन्सने या सायबर चोरीबाबत केंद्र सरकारला पूर्वकल्पना दिली होती. मात्र, नेमका किती डेटा लीक झाला आहे आणि त्याचे गांभीर्य किती आहे, याची स्पष्ट माहिती सरकारला देण्यात आली नव्हती, असे आता समोर येत आहे.

Kudankulam Nuclear Power Plant: 8.5 लाख फाईल्सपैकी 19000 फाईल्स अत्यंत संवेदनशील

डार्क वेबवर अपलोड करण्यात आलेल्या एकूण 8 लाख 58 हजार फाईल्सपैकी तब्बल 19000 फाईल्स या 'अत्यंत संवेदनशील' प्रवर्गातील आहेत. या लीक झालेल्या डेटाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनीकडून सध्या कुडनकुलम प्रकल्पाच्या युनिट-3 आणि युनिट-4 ची निर्मिती केली जात आहे. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या या दोन्ही युनिट्समधून सुमारे 2000 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. याच युनिट्सची गोपनीय माहिती उघड झाली आहे.

लीक झालेल्या विम्याच्या कागदपत्रांमध्ये असा कथित उल्लेख आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक विशेष विमा काढला आहे. यानुसार, दोन्ही युनिटवर दहशतवादी हल्ला झाल्यास 11.2 कोटी डॉलरपर्यंतच्या विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

Kudankulam Nuclear Power Plant: सायबर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; तपास सुरू

या संवेदनशील प्रकरणाची माहिती मिळताच भारताचा अणुऊर्जा विभाग तातडीने रिलायन्सच्या संपर्कात आला आहे. भारताची सर्वोच्च सायबर सुरक्षा संस्था या संपूर्ण डेटा लीक प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. जरी लीक झालेल्या दस्तऐवजांची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे पडताळली गेलेली नसली, तरी राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने यंत्रणा अत्यंत गोपनीयतेने आणि वेगाने तपास करत आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

World Leaks: यापूर्वी टाटा समूह आणि नाईकीला केले होते टार्गेट

डेटा लीक करणारा 'वर्ल्ड लीक्स' हा सायबर गुन्हेगारांचा गट अत्यंत सक्रिय मानला जातो. यापूर्वी त्यांनी नामांकित ब्रँड 'नाईकी' आणि भारतातील नामांकित 'टाटा समूहाला' टार्गेट केले होते. जून महिन्यात या ग्रूपने टाटा समूहाचा डेटा चोरून त्याबदल्यात 15 लाख डॉलरची खंडणी मागितली होती. ही खंडणी न मिळाल्याने त्यांनी तो डेटा सार्वजनिक केला होता. आता त्यांनी भारताच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केल्यामुळे चिंता वाढली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget