एक्स्प्लोर

कोल्हापुरात स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी 15 लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ सापडला, ब्लॅकमेलिंगचा धंदा उघड

जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.

Kolhapur Crime News: सामाजिक कार्यकर्त्याच्या मुखवट्याआड खंडणीचा गोरखधंदा करणाऱ्या जयराज कोळीला पोलिसांनी 15 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे. औषधी उपकरणांच्या पुरवठादाराकडून खोट्या चौकशी अर्जाच्या आधारे ब्लॅकमेल करून ही रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कागल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जयराज कोळी आणि त्याचा साथीदार युवराज खराडे यांना अटक केली. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, कोळीने "खंडणी द्या, अन्यथा तुझ्या पत्नीच्या नावाने खोटे चौकशीचे अर्ज टाकून त्रास देण्याची धमकी दिली होती.

नेमकं घडलं काय?

स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी यांना 15 लाखाची खंडणी घेताना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. जयराज कोळी बरोबरच त्याचा साथीदार युवराज खराडेला देखील पोलिसांनी अटक केली.औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला जयराज कोळी चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता.

यानंतर मी सगळे अर्ज मागे घेतो मात्र 20 लाख रुपये दे अशी मागणी जयराज कोळी यांने केली... शेवटी 15 लाखावर तडजोड झाली आणि कागलच्या लक्ष्मी टेकडीच्या जवळ हे पैसे देण्याचे ठरले. फिर्यादीने आधीच या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडेला पकडले. या दोघांवर देखील कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक कार्याच्या नावाखाली जयराज कोळी याने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर मध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून संबंधित व्यक्तींना त्रास देत पैशाची मागणी केली जात असे. मात्र या प्रकरणात जयराज कोळी याचे कारनामे समोर आले. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.

औषधी उपकरण पुरवठादाराकडून खंडणी

जयराज कोळीने सामाजिक कार्याचा मुखवटा घालून सीपीआर रुग्णालयासह विविध ठिकाणी माहिती अधिकाराचे (RTI) अर्ज टाकून ब्लॅकमेलिंग सुरू केली होती. त्याच पद्धतीने औषधी उपकरण पुरवठादाराकडून खंडणी मागण्यात आली होती. 15 लाख रुपये रोख स्वरूपात घेताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं.

कोळीविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. खंडणी, धमकी आणि खोट्या चौकशांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार त्याने वेळोवेळी केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी कोणत्या व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तींना कोळीने टार्गेट केलं होतं, याची माहिती घेत आहेत.

हेही वाचा

'माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल, तुझ्यासारखा मस्ती असलेला मॅनेजर बघितला नाही!'; भाजप आमदाराची बँक मॅनेजरला शिवीगाळ

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget