एक्स्प्लोर

Kolhapur Crime: कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं, चकीत करणारं कारण समोर!

Kolhapur Crime news: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते या गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत बहुसंख्य विद्यार्थी हे बिहार या राज्यातील आहेत.

Kolhapur Crime News: राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या (Murder News) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एकच खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. अलीकडेच फैजानचा मृतदेह सापडला होता. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.

Kolhapur News: नेमकं काय घडलं? 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते या गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत बहुसंख्य विद्यार्थी हे बिहार या राज्यातील आहेत. एकूण 80 मुलं या संस्थेत धार्मिक शिक्षण घेतात. त्यापैकी 70 विद्यार्थी हे बिहारचे आहेत. अल्पवयीन मुलं घर सोडून शेकडो किमी परराज्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येतात, तिथे धार्मिक शिक्षण घेतात. या सर्व प्रकाराला कंटाळून, घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. 

शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या केली. फैजान नाजिमा असं या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो 11 वर्षाचा होता. फैजान याचा झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी पोलिसांच्या चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले. इतकी थरारक, धक्कादायक आणि तितकीच हादरवणारी ही महाराष्ट्रातील पहिली घटना असावी. 

आणखी वाचा

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget