एक्स्प्लोर

Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं

Kolhapur Crime news: कोल्हापूरमधील पेठवडगाव हादरले, भर पावसात एसटी स्टँडवर पतीने पत्नीला वार करुन संपवलं, घटनेने परिसरात खळबळ. दीपक कांबळे आणि अमृता कांबळे यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह

Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा' असा मोबाईलवर स्टेट्स ठेवून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.  कोल्हापूरच्या (Kolhapur news) पेठवडगाव येथे  भररस्त्यात ही धक्कादायक घटना घडली. अमृता कांबळे (वय 30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती दीपक कांबळे (वय 35) याने कोयत्याने सपासप वार करुन तिची हत्या (Murder news) केली. दीपक हा अमृताच्या चारित्र्यावर वारंवार शंका घ्यायचा. याच कारणावरुन दीपक कांबळे पत्नीची हत्या करून 'विषय संपवला' म्हणत पतीने मिशीवर ताव मारत  पळ काढला होता. कोल्हापूरच्या पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील परिसरात बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे वडगाव शहर एकच खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, दीपक कांबळे आणि अमृता कांबळे यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. बुधवारी अमृता कांबळे या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दीपक कांबळे तिकडे आला. त्याठिकाणी दीपक आणि अमृता यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी दीपकने त्याच्याजवळील कोयत्याने अमृता यांच्यावर एकापाठोपाठ एक वार केले. यामध्ये अमृता कांबळे गंभीर जखमी झाल्या. त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या होत्या.यानंतर अमृता कांबळे यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा जोरदार पाऊस सुरु होता. हा सगळा प्रकार पाहायला बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती. 

ही घटना घडली तेव्हा पेठवडगावच्या एसटी स्टँडच्या परिसरात अनेकजण उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडली. दीपक अमृता यांच्यावर कोयत्याने वार करत असताना काही तरुण त्याला रोखण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, दीपकने त्यांना म्हटले की, 'ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका.' यानंतर दीपकने अमृता कांबळे यांच्यावर कोयत्याने आणखी वार केले. यानंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी,  पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे , काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकरल, लखन सावंत, कुलदीप मोहिते यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पथकानेही नमुने गोळा केले आहेत. सध्या पोलीस दीपक कांबळे याचा शोध घेत आहेत. तर अमृता कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

आणखी वाचा

केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Nagpur Crime: खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Embed widget