एक्स्प्लोर

Karnataka: उडपीतील कॉलेजमध्ये मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ प्रकरण; सीआयडी तपासाचा पहिला टप्पा पूर्ण

Karnataka Udupi Hidden Camera News: उडपीतील एका महाविद्यालयात मुलींच्या शौचालयात छुपा कॅमेरा लावण्यात आला होता, त्याद्वारे व्हिडीओ शूट करण्यात आला होता.

Udupi Hidden Camera In Washroom: कर्नाटकातील उडपी शहरात असलेल्या नेत्रज्योती पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्ड (Girl Restroom Video) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती, या प्रकरणातील सीआयडी (CID) तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेल्या घटनेचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सीआयडी तपासाचा पहिला टप्पा पूर्ण

उडपीतील महाविद्यालयात घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती, यानंतर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपावण्यात आला होता. टॉयलेटमधील व्हिडीओ प्रकरणाच्या तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सीआयडीचे अधिकारी उडपीहून बंगळुरूला परतले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची सीआयडीकडून चौकशी

डेप्युटी एसपी अंजुमाला यांनी टॉयलेटमधील व्हिडीओ प्रकरणाचा तपास केला होता. सीआयडी एडीजीपी मनीष खरबीकर यांच्या देखरेखीत हा तपास पूर्ण झाला आहे. सीआयडी पथकाने या प्रकरणाशी संबंधित पीडित, आरोपी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन अधिकारी आणि इतर संबंधित व्यक्तींची अनेक वेळा चौकशी केली आणि जबाब नोंदवले आहेत.

तीन आरोपी विद्यार्थिनींचे मोबाईल जप्त

उडपी गर्ल्स कॉलेज टॉयलेट व्हिडीओ प्रकरणी सीआयडीच्या टीमने तीन आरोपी विद्यार्थ्यांकडून फोन जप्त केले आहेत. सीआयडी आता जप्त केलेल्या या तीन मोबाईलच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) अहवालाची वाट पाहत आहे. तपास अधिकारी या घटनेचा अहवाल लवकरच सादर करतील, असंही सूत्रांकडून समजतं आहे.

भाजपकडून आरोपी मुलींवर कारवाईची मागणी

भाजप पक्ष आरोपी असलेल्या तीन मुस्लिम विद्यार्थिनींवर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. मुस्लिम मुलींनी हिंदू मुलींचा टॉयलेटमधील व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी दिला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कर्नाटक राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेस या घटनेला दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. काँग्रेस सरकार राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला.

पीडित मुलगी आरोपी मुलींवर गुन्हा दाखल करण्यास इच्छुक नाही

महिला कार्यकर्त्या रश्मी सामंत यांनी या विषयावर आवाज उठवला होता, पण कर्नाटक पोलिसांनी त्यांचाही छळ केल्याचा आरोप भाजपने केला. दरम्यान, ज्या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला, त्या पॅरा-मेडिकल कॉलेजने असं म्हटलं की, पीडित मुलगी ही आरोपी मुलींविरुद्ध तक्रार करण्यासाठी इच्छुक नाही.

पोलिसांनी दबावाखाली येऊन स्वत:हून नोंदवला गुन्हा

सुरुवातीला पुराव्याअभावी गुन्हा दाखल करू शकत नसल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. तथापि, ही घटना देशाला हादरवणारी बातमी असल्याचं दिसून आल्याने दबावाखाली आल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करून प्रकरणाता तपास सुरू केला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उडपीमध्ये पोहोचल्या होत्या.

सीआयडीकडे प्रकरण, आरोपी मुली जामिनावर बाहेर

उडपी गर्ल्स कॉलेज टॉयलेट व्हिडीओ प्रकरणी भाजपने राज्यभर आंदोलनही केलं होतं. नंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं. या प्रकरणातील तीन आरोपी विद्यार्थिनी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

हेही वाचा:

Bhandara: तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न; मद्यपी बापाचा संतापजनक प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget