एक्स्प्लोर

Karnataka Crime News: 100 जणांचे मृतदेह दफन केले; अनेक महिलांचे नग्न अवस्थेत मृतदेह पाहिले, सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यानं देश हादरला

Karnataka Crime News: कर्नाटकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने तब्बल 100 मृतदेह पुरल्याचा दावा केल्यानं संपूर्ण कर्नाटकासह देश हादरला आहे.

Karnataka Crime News: कर्नाटकच्या बेलथांगडी न्यायालयात 11 जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक न्यायालयाच्या परिसरात गर्दी वाढली. लोकांना काही समजण्यापूर्वीच कडक बंदोबस्तात एक व्यक्ती न्यायालयाच्या आवारात शिरला. पूर्णपणे काळ्या कपड्यात झाकलेल्या त्या व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज उभी होती. न्यायालयात सदर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानं संपूर्ण कर्नाटकासह देश हादरला. 

1995 ते 2014 दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली, महिला आणि पुरुषांचे जवळपास 100 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते, असा दावा सदर सफाई कर्मचाऱ्याने (Karnataka Mass Burial Case) केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी इतके वर्षे गप्प होतो, असं या सफाई कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. सदर व्यक्ती धर्मस्थळस्थित एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेत काम करत होता. त्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला.

नेमकं प्रकरण काय? (Karnataka Mass Burial Case)

1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ परिसरात सदर सफाई कामगार म्हणून काम करत होता. या काळात त्याला अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. सफाई कामगाराने त्याच्या जबाबात असेही म्हटले आहे की पुरलेल्यांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या. मी नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिले, असंही हा सफाई कर्मचारी म्हणाला. सफाई कर्मचाऱ्यानं मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावेदेखील दिले. 

मला सुरक्षा पुरवा, मी सगळं सांगतो-

1998 मध्ये जेव्हा मी मृतदेह दफन करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देणार होता तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार करणाऱ्या सदर सफाई कर्मचाऱ्याने असंही जबाबात म्हटलं की, धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते. याशिवाय काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता. या सगळ्यामागे काही 'शक्तिशाली लोक' आहेत. जर त्याला पुरेशी सुरक्षा दिली तरच तो त्या लोकांची ओळख उघड करू शकेल, असं सदर सफाई कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

तपास करण्यासाठी एसआयटी टीम स्थापन-

सदर प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांच्या एक टीमनं तपासासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारनं रविवारी (20 जुलै) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची (एसआयटी) स्थापना केली आहे. या एसआयटीचं नेतृत्व डीजीपी दर्जाचे अधिकारी प्रणब मोहंती करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Crime News: मुलावर तीन जणांनी केला अत्याचार; दोन आरोपी अल्पवयीन, मुंबईतील धक्कादायक घटनेनं खळबळ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Shivsena Vs BJP: भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
Embed widget