एक्स्प्लोर

Kalyan Crime : पायातल्या चपलांनी हल्लेखोराचा शोध, महिलेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला सहा तासांत बेड्या

Kalyan Crime : घटनास्थळी आढळलेल्या चपलेच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि सहा तासांमध्ये आरोपीला जेरबंद केलं. 

ठाणे : कल्याण खडकपाडा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली.  एका दाम्पत्याच्या घरामध्ये खिडकीतून घुसून अज्ञात व्यक्तीने महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर सहा तासात पोलिसांनी हल्लेखोराला बेड्या ठोकल्या. घटनेच्या ठिकाणी असलेल्या चपलेमुळे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं. 

रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीतून आत शिरून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कल्याण कोळवली परिसरात घडला होता. महिलेच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार करुन हल्लेखोर पसार झाला होता. जखमी महिला सोनम पाल हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा सुरू केला त्यावेळी त्यांना पायातील एक चप्पल त्या ठिकाणी आढळून आली. याच चपलेने पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचवले. 

घटनेच्या ठिकाणी मिळालेली चप्पल ही कोणाची आहे याचा  तपास पोलिसांनी त्या परिसरामध्ये सुरू केला. त्यावेळी एका महिलेने ती चप्पल माझ्या मुलाची आहे असे सांगितल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर गंगाधर या नराधमाला पोलिसांनी अवघ्या सहा तासात बेड्या ठोकल्या. या महिलेवर हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्या व्यक्तीने महिलेवर घरात जाऊन हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत. 

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेससीची हत्या 

कल्याणमध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराने प्रेयसीची चाकूने वार करत हत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

कल्याण पूर्व विजय नगर येथील आमराई परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनेचा तपास करता पोलिसांकडून ही हत्या चारित्र्याच्या संशयावरून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. रसिका कोळंबेकर आणि विजय जाधव हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून आज विजयने रसिकावर चाकूने हल्ला करत तिची राहत्या घरी हत्या केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
Ketan Agrawal Siya Goyal Pune Lohagadh Case: चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Embed widget