एक्स्प्लोर

Kalyan Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बाऊंसरलाच लुटलं, धूम स्टाईलने महागडा मोबाईल केला लंपास

Kalyan Crime : मोबाईल पळवून नेताना सोबत त्या बाऊंसरलाही फरफटत नेल्याची घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला दोन तासात बेड्या ठोकल्या. 

कल्याण: पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि बाऊंसरच्या खिशातील महागडा मोबाईल चोरट्याने धूम स्टाईल पळवून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरील चोराला पकडण्यासाठी पाठलाग करत असतानाच, चोरट्याने   बाऊंसरला दुचाकीसह फरफटत नेल्याने बाऊंसर जखमी झाला आहे. ही घटना कल्याण पश्चिम दुर्गाडी किल्ल्याजवळ घडली आहे.  

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या चोरट्याला दोन तासातच बेड्या ठोकल्या आहे. फरहाद खान असे अटक चोरट्याचे नाव आहे. तर अंकुर शिंदे असे चोरट्याला पकडताना जखमी झालेल्या बाऊंसरचे नाव आहे. 

अंकुर शिंदे हा उल्हासनगर कँम्प नंबर दोन भागातील महात्मा गांधी नगरमध्ये आईसह राहतो. तो ठाणे शहरातील एका बिल्डर्सकडे बाऊंसर म्हणून नोकरीला आहे. त्यातच नेहमी प्रमाणे 10 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजल्याच्या सुमारास ठाणे येथून एका खाजगी वाहनाने येऊन कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला येथील चौकात असलेल्या बस स्थानकाजवळ उतरला. त्यानंतर उल्हासनगर मधील घरी जाण्यासाठी चौकात रिक्षा, बसची वाट पाहत असतानाच त्या ठिकाणी एका दुचाकीवरून दोघे अनोखळी तरुण येऊन त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

आपण या परिसरात नवीन आहोत त्यामुळे पत्ता सांगू शकत नाही असं अंकुरने त्या दोघांना सांगितलं. मात्र असं बोलताच दुसऱ्या दुचाकी आलेल्या चोरट्याने बाऊंसर अंकुरच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळून जात असतानाच, बाऊंसरने त्याचा पाठलाग करत त्याची दुचाकीला मागून  पकडले. मात्र चोरट्याने दुचाकी धूम स्टाईलने नेत  बाऊंसरला काही अंतरापर्यत फरफटत नेल्याने हातापायाला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत  बाऊंसरने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. 

दरम्यान तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड  याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, बाऊंसर अंकुरने दिलेल्या दुचाकीच्या वर्णनावरून आम्ही तात्काळ आमच्या दुसऱ्या बीट चौकीला कळवले आणि तिघापैकी एका आरोपीला दोन तासात कल्याण परिसरातून ताब्यात घेतले. 

आरोपी फरहाद खान आणि फरार असलेल्या त्याच्या साथीदाराला दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे बाऊंसरचा महागडा मोबाईल पळवला होता. आता मोबाईल पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत करून आरोपीवर  भादंवी कलम 394 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget