एक्स्प्लोर

Kalyan Crime : कॉन्ट्रॅक्टरवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांना सुपारी, सहा जण ताब्यात

कल्याण पूर्वेतील चाळ कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉन्ट्रॅक्टरवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता. त्यांना 10 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

कल्याण : कल्याण पूर्वेतील चाळ कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मुलांना हल्ला करण्यासाठी 10 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. चाळीतले घर बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोटेशनवरुन एका कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची सुपारी दिली होती. या घटनेच्या निमित्ताने चाळीतील घरे दुरुस्त करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरमध्येही जीवघेणी स्पर्धा असल्याचे दिसून आलं आहे. 

कल्याण पूर्वेतील खडगोळवली परिसरात राहणारे बिपीन मिश्रा हे चाळ कॉन्ट्रॅक्टर असून चाळीतील घरे दुरुस्तीचे काम करतात. खडेगोळवलीतील एका पान सेंटरसमोर 14 मार्च रोजी कॉन्ट्रॅक्टर बिपिन मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात बिपिन मिश्रा जबर जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला. 

कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना पोलिसांनी तपास करत या प्रकारणार चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलांकडून झालेला खुलासा धक्कादायक होता. सोनू उर्फ नाककट्या नावाच्या व्यक्तीने बिपीन मिश्रावर हल्ला करण्यासाठी दहा हजार रुपये दिले होते. पोलिसांनी सोनू उर्फ नाककट्याला ताब्यात घेतलं. सोनूला पोलीस खाक्या दाखवताच त्याने प्रमोद चव्हाण याने आपल्याला 25 हजार रुपये दिल्याचं सांगितलं. कोलशेवाडी पोलिसांनी प्रमोद चव्हाण याला ताब्यात घेतलं. 

प्रमोद चव्हाण हा देखील चाळ कॉन्ट्रॅक्टर आहे. प्रमोद आणि बिपीन यांच्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. बिपीन मिश्राचा काटा काढण्यासाठी प्रमोद चव्हाणने त्याची सुपारी दिली. तर सोनूने फक्त दहा हजार रुपये देत या हल्ल्यासाठी लहान मुलांचा वापर केला होता. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget