एक्स्प्लोर

कोंबडी खाल्ल्याच्या कारणावरुन मालकाने शेजारच्याच्या मांजराची गोळी घालून केली हत्या

कोंबडी खाल्ल्याच्या कारणावरून कोंबडी मालकाने शेजारच्याच्या मांजराची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

जळगाव : आपली कोंबडी मांजराने खाल्ल्याचा राग अनावर झालेल्या हेमराज सोनावणे नावाच्या गृहस्थाने चक्क बंदुकीची गोळी मांजराच्या पिलाच्या डोक्यात घातली. यात पिल्लाच जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील गिरणा पंपींग रोड जवळील योजना नगर भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हेमराज सोनवणे याला ताब्यात घेतले असून शहरातील तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
     
जळगाव शहरातील योजना नगर भागात हेमराज सोनवणे आणि पुष्कराज बानाईत हे दोन शेजारी राहतात. हेमराज सोनवणे यांना कोंबड्या पाळण्याची आवड आहे तर बानाईत यांना मांजरी पाळण्याची आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून बानाईत यांनी पाळलेली मांजर हेमराज सोनवणे यांच्या कोंबड्यांची पिल्ले फस्त करत होती. यामुळे हेमराज सोनावणे यांचा बानाईत आणि त्यांच्या मांजरीवर वर राग होता. त्यातच आज सकाळी हेमराज सोनावणे हे आपल्या घरच्या जवळ उभे असतानाच बानाईत यांच्या मांजरीच्या पिल्लाने सोनवणे यांच्या कोंबडीचे पिलू मारल्याचे सोनवणे यांनी डोळ्याने पाहिले. अगोदर राग असतानाच आजच्या या घटनेने हेमराज सोनावणे अधिक संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या घरात असलेली  बंदूक काढून शेजारच्या घराजवळ बसलेल्या मांजराच्या पिल्लाला थेट गोळ्या घालून आपला संताप व्यक्त केला आहे.

यावेळी शेजाऱ्यांनी झाल्या प्रकारबद्दल सोनावणे यांना विचारणा केली असता तुमच्या सर्व मांजरी मारून टाकेल आणि तुम्हाला ही पाहून घेईल अशी धमकी सोनावणे यांनी दिल्याचा आरोप पुष्कराज बानाईत यांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हेमराज सोनावणे याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात संशयित आरोपी हेमराज सोनावणे यांच्या पत्नी अनिता सोनवणे यांनी म्हटल आहे की माझे पती हे फोटोग्राफी व्यवसाय करायचे मात्र मागील काळात कोरोनाचं संकट समोर आले आणि आमचा व्यवसाय बंद झाला. घरात सात लोकांचं कुटुंब कस सांभाळायचं म्हणून आम्ही कोंबड्या पाळल्या होत्या त्यावर आमचा उदरनिर्वाह असायचा. मात्र शेजारच्या मांजरीच्या पिल्लाने रोज कोंबड्या खायला सुरूवात केल्यानं आमचं पन्नास हजार रुपयांचा नुकसान झालं. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला, मांजर जखमी झाली आहे. आम्ही स्वतः प्राणी मित्र संघटनेत काम करतो आम्ही असं करणार नाही, त्यांची चूक झाली असं वाटत नाही.

या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी म्हटल आहे की कोंबडी खाल्ली म्हणून मांजरीला छर्या बंदुकीने गोळी घालून मारल्याची घटना झाल्याची तक्रार मांजर मालकांनी पोलिसात केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज पोलिसांनी केली असल्याचं म्हटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget