Pradeep Purnekar and Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
Pradeep Purnekar and Rajendra Shinde: तोच शर्ट, तीच पँट आणि तेच शूज... पूर्णेकरांच्या मुलाने सर्वात मोठा पुरावा समोर आणला.

Pradeep Purnekar and Rajendra Shinde: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात (Pradeep Purnekar Death case) त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी सर्वात मोठा पुरावा समोर आणला आहे. राम पूर्णेकर यांनी सोमवारी ठाण्यात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) आणि पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत राजेंद्र शिंदे हे पूर्णेकरांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या पप्या शिंदे, नितेश पवार, संतोष कनोजिया (टल्ली), अमित सिंग (पपलू) यांच्यासोबत दिसत आहेत. (Thane Crime news)
आज पप्पांना जाऊन 26 दिवस झाले. पण आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त कॉल करुन आश्वासन दिले. पण अजूनही मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे या दोघांना अटक झालेली नाही. एक पोलिस अधिकारी आहेत त्यांचे आभार. त्यांनी हेल्मेट घालून आलेला व्यक्ती राजा शिंदे आहे, त्याचा व्हिडिओ पाठवला. या व्हिडीओत पहिला आरोपी नितेश पवार, राजा शिंदे , टल्ली , पप्प्या शिंदे सर्वजण दिसत आहेत. या व्हिडीओनंतर आता पोलीस राजेंद्र शिंदे यांच्यावर काय कारवाई करणार, हे बघावे लागेल.
ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत राजेंद्र शिंदे यांना आतापर्यंत सातवेळा चौकशीला बोलावले आहे. सातही वेळ राजेंद्र शिंदे यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे मारेकरी आणि राजेंद्र सिंह यांना समोरासमोर बसवूनही चौकशी झाली होती. मात्र, या तपासातून नेमकी कोणती महत्त्वाची माहिती समोर आली, हे अद्याप कळू शकलेले नाही.
प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार मारले होते. याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आणखी वाचा























