11 मेला लग्न, 20 मेला हानिमूनसाठी शिलाँगला गेले अन् 23 मेला मोबाइल ऑफ... राजा रघुवंशीच्या हनीमूनपासून हत्येपर्यंत A टू Z घटनाक्रम
हानिमुनला गेलेलं इंदौरचे सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणाची सध्या देशभर जोरदार चर्चा आहे. या प्रकरणाचं गुढ हळूहळू उलगडत असताना नक्की हे प्रकरण काय? आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं? पाहूया..

Raja Raghuwanshi Murder Case: मध्य प्रदेशमधील इंदौरमधील रहिवासी राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी मधुचंद्रासाठी गेलेलं जोडपं बेपत्ता झालं. पण नंतर पोलिसांना 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. मृतदेहासोबत पोलिसांना मर्डर वेपनही मिळाल्यानं सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणाची संपूर्ण देशभरात मोठी चर्चा झाली. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इंदौरच्या या मर्डरकेसचं गुढ हळुहळु उलगडताना दिसत आहे. मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीनेच केली. हत्येनंतर सोनम मेघालयावरून गाजीपूर भागात गेली. नंतर दबाव वाढल्याने तिने आत्मसमर्पण केलं. मेघालयच्या डीजीपीनं सांगितलं की या प्रकरणात सोनमसह 5 जणांना अटक झाल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, हे सोनमनं ना आत्मसमर्पण केलं ना तिला अटक झाली असा दावा राजा रघुवंशीच्या भावानं केल्यानं या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. नक्की हे प्रकरण काय? आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं? पाहूया.. (Indore Missing Couple Crime News)
मधुचंद्रापासून हत्येपर्यंतची संपूर्ण घटनाक्रम नक्की काय?
1. राजा रघुवंशी आणि सोनम यांचे लग्न 11 मे 2025 रोजी झाले. 9 दिवसांनी 20 मे रोजी हे जोडपे त्यांच्या मधुचंद्रासाठी मेघालयला रवाना झाले. सोनमने त्यांच्या हनिमूनसाठी शिलाँगला जाण्याचा प्लॅन केला होता. तिने हॉटेलपासून तिकिटांपर्यंत सर्व काही बुक केले होते. पोलिसांच्या मते, या हत्येच्या नियोजनातील हे पहिले पाऊल होते.
2.23 मे रोजी दोघेही शिलाँगमधील नोंग्रिअट गावातील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजला भेट देण्यासाठी गेले होते. या दिवशी दोघेही अचानक बेपत्ता झाले. त्यांचे फोनही बंद झाल्यानं कुटुंबाशी संपर्क तुटला.त्यानंतर ही बाब चर्चेत आली. दुसऱ्या दिवशी 24 मे रोजी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी सोहराजवळील एका निर्जन ठिकाणी सोडून दिलेली आढळली. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता जोडप्याचा गुन्हा दाखल केला.
3.राजा आणि सोनमचे कुटुंब शिलाँगला पोहोचले. स्थानिक पोलिसांनी दोघांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. 2 जून 2025 रोजी पोलिसांना राजाचा मृतदेह वेइसावॉन्ग धबधब्याजवळील एका खोल दरीत आढळला. शवविच्छेदनात हत्येची पुष्टी झाली. वरून धक्का बसल्याने डोक्याला खोल दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
4. राजाचा मृतदेह सापडला, पण सोनम अजूनही बेपत्ता होती. पोलिसांना आता सोनमवर हत्येचा संशय आला, त्यानंतर पोलिसांनी तिचे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. वाढत्या दबावामुळे 8-9 जूनच्या रात्री सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केल्याचा दावा मेघालय पोलिसांनी केला.
5.पोलिसांनी असा दावा केलाय की सोनमचे राजा रघुवंशीशी लग्न झाले असताना तिचे राज कुशवाह नावाच्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. त्यांनी म्हटले आहे की तिने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून ही हत्या करण्याचा कट रचला होता. सुरुवातीच्या तपासात असेही समोर आले आहे की, सोनम अनेकदा राज कुशवाहाशी बोलत असे. अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज देखील सापडले आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेशातील तीन ते चार लोक मारेकरी म्हणून ओळखले गेले आहेत.
6.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज शिलाँगला आला नव्हता आणि तो फोनवरून संपर्कात होता. पोलिसांनी सांगितले की, "आकाश, विशाल आणि आनंद हे तिघेही मारेकरी शिलाँगमध्ये उपस्थित होते. सोनमने जाणूनबुजून राजाला एका निर्जन भागात नेले, त्यानंतर तिघांनी राजाची हत्या केली. हत्येनंतर आकाश, विशाल आणि आनंद शिलाँगहून गुवाहाटीला गेले आणि येथे तिघेही वेगळे झाले. असं पोलिसांनी सांगितलं.
7. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, सोनम केवळ राज कुशवाहच्या सतत संपर्कात होती. ती तिचे लोकेशनही पाठवत होती. हे लोकेशन आनंद, आकाश आणि विशालपर्यंत पोहोचवत होते. या संपूर्ण गुन्हेगारी कारवाई दरम्यान,राज इंदौरमधील सोनम, आनंद, आकाश आणि विशालच्या संपर्कात होता.8 तारखेला सकाळी मेघालय पोलिसांनी इंदूर पोलिसांना कळवले की राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तिन्ही संशयित इंदूरमध्ये उपस्थित आहेत.
8. अनेक ठिकाणांहून तांत्रिक देखरेख आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, पोलिसांनी प्रथम ललितपूर गाठले आणि तेथून आकाश राजपूतला अटक केली. त्यानंतर विशाल आणि राज कुशवाहाला इंदूर येथून अटक करण्यात आली. पाचवा आरोपी आनंद याला सागर येथून अटक करण्यात आली.
हेही वाचा
10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या























