इंस्टाग्रामवरील मित्रानेच केला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक, तिसरा फरार
Gondia Crime News: गोंदिया शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन (Minor Girl) मुलीशी इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण गोंदियात उघडकीस आले आहे.
Gondia Crime News: गोंदिया शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन (Minor Girl) मुलीशी इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण गोंदियात उघडकीस आले आहे. यात गोंदिया पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्या तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेने गोंदिया जिल्हा हादरून गेला आहे.
पीडित मुलीगी ही इंस्टाग्रामवर तथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्यातून तिची तीन तरूनांसोबत ओळखी झाल्यानंतर त्यांची मैत्री वाढली. यातून दोघांनी गैरफायदा उचलत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केला. तर एकाने तिला बाहेर नेले होते. याप्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून गोंदिया सिटी पोलिसांनी तीन तरूनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात 27 वर्षीय प्रशात मोटघरे, 23 वर्षीय सौरभ मेश्राम याला अटक करीत न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत दोघांची रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी फरार झाला असून गोंदिया पोलीस त्याचा शोध घेत आहे. मुलीवर दोन ठिकाणी अत्याचार झाल्याच्या बाबीला ठाणेदार सूर्यवंशी यांनी दुजोरा दिला असून तिच्यावर सामूहिक अत्याचार नसून मैत्रीतून हे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे.
लातूरमध्ये गुंगीचे औषध पाजून 16 वर्षीय मुलीवर बलात्कार
लातूर जिल्ह्यातही (Latur) 22 जानेवारी रोजी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. शहरातील महिला आणि बालविकास विभागाच्या एका निरीक्षण बालगृहातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या मैत्रिणीसह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. यातील एका महिलेला अटक देखील करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षण बालगृहातील एक मुलगी एका महविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, तिची आठवीपासूनची एक मैत्रीण तिच्याच सोबत शिक्षण घेत आहे. दरम्यान, बुधवारी 18 जानेवारीला या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी पीडीत मुलीच्या मैत्रिणीच्या आणखी दोन मैत्रिणी तिथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पार्टी करू म्हणून या दोघींना सोबत चालण्याची विनंती केली. त्यामुळे पीडीत मुलगी आणि तिची मैत्रीण त्या मैत्रिणीसोबत जाण्यास तयार झाल्या. पार्टीला जाण्याचं ठरल्यावर आलेल्या मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर मैत्रिणीचा पती तिथे ऑटोरिक्षा घेऊन आला. रिक्षाचालकासह पाच जण अंबाजोगाई मार्गावरील एका ज्वारीच्या शेतात गेले आणि तिच्यावर बलात्कार केला.